हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.

स्पष्ट कीजिए

उत्तर

अलैंगिक प्रजननाच्या निरनिराळ्या पद्धती विविधसजीवांत आढळतात.

  1. द्विविभाजन: या प्रकारात जनकपेशीचे दोन समान भागांत विभाजन होते. त्यामुळे दोन नवजात पेशी तयार होतात. हे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते. ज्या वेळी अनुकूल परिस्थिती असते आणि मुबलक अन्न उपलब्ध असते, अशा वेळी या पद्धतीचा वापर केला जातो. जीवाणू, आदिजीव, दृश्यकेंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. विभाजनाच्या अक्षाप्रमाणे वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये द्विविभाजनाचे पुढील प्रकार आहेत:
    • साधे द्विविभाजन - अमिबा विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो; म्हणून याला 'साधे द्विविभाजन' म्हणतात.
      उदा., अमिबा.
    • आडवे द्विविभाजन - पॅरामेशियम 'आडवे द्विविभाजन' यापद्धतीने विभाजित होतो.
      उदा.,
      पॅरामेशिअम
    • उभे द्विविभाजन - युग्लीना 'उभे द्विविभाजन' या पद्धतीने विभाजित होतो.
      उदा.,
      युग्लीना.
  2. बहुविभाजन: प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा अन्न अपुरे असते, तेव्हा आदिजीव बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. अशा वेळी अमिबा संरक्षक कवच तयार करतात.
     पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते. त्यामुळे अनेक केंद्रके तयार होतात. मग पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थितीत ते पुटीतच राहतात. ज्या वेळी अनुकूलता असते अशा वेळी पुटी फोडून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात.
  3. कलिकायन: किण्व कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. प्रथम जनक पेशी सूत्री विभाजनाने दोन नवजात केंद्रके तयार होतात. या पेशीला बारीकसा फुगवटा किंवा कलिका येते. दोन नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये शिरतो. कलिकेची योग्य वाढ होते आणि नंतर ती जनकपेशीपासून वेगळी होऊन स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून वाढू लागते.
shaalaa.com
प्रजनन (Reproduction) - अलैंगिक प्रजनन (Asexual reproduction)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - स्वाध्याय [पृष्ठ ३५]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
स्वाध्याय | Q 4. अ. | पृष्ठ ३५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×