Advertisements
Advertisements
Question
एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.
Explain
Solution
अलैंगिक प्रजननाच्या निरनिराळ्या पद्धती विविधसजीवांत आढळतात.
- द्विविभाजन: या प्रकारात जनकपेशीचे दोन समान भागांत विभाजन होते. त्यामुळे दोन नवजात पेशी तयार होतात. हे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते. ज्या वेळी अनुकूल परिस्थिती असते आणि मुबलक अन्न उपलब्ध असते, अशा वेळी या पद्धतीचा वापर केला जातो. जीवाणू, आदिजीव, दृश्यकेंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. विभाजनाच्या अक्षाप्रमाणे वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये द्विविभाजनाचे पुढील प्रकार आहेत:
- साधे द्विविभाजन - अमिबा विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो; म्हणून याला 'साधे द्विविभाजन' म्हणतात.
उदा., अमिबा. - आडवे द्विविभाजन - पॅरामेशियम 'आडवे द्विविभाजन' यापद्धतीने विभाजित होतो.
उदा., पॅरामेशिअम - उभे द्विविभाजन - युग्लीना 'उभे द्विविभाजन' या पद्धतीने विभाजित होतो.
उदा., युग्लीना.
- साधे द्विविभाजन - अमिबा विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो; म्हणून याला 'साधे द्विविभाजन' म्हणतात.
- बहुविभाजन: प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा अन्न अपुरे असते, तेव्हा आदिजीव बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. अशा वेळी अमिबा संरक्षक कवच तयार करतात.
पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते. त्यामुळे अनेक केंद्रके तयार होतात. मग पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थितीत ते पुटीतच राहतात. ज्या वेळी अनुकूलता असते अशा वेळी पुटी फोडून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. - कलिकायन: किण्व कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. प्रथम जनक पेशी सूत्री विभाजनाने दोन नवजात केंद्रके तयार होतात. या पेशीला बारीकसा फुगवटा किंवा कलिका येते. दोन नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये शिरतो. कलिकेची योग्य वाढ होते आणि नंतर ती जनकपेशीपासून वेगळी होऊन स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून वाढू लागते.
shaalaa.com
प्रजनन (Reproduction) - अलैंगिक प्रजनन (Asexual reproduction)
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन ______ प्रकारचे आहे.
पुरुष आणि स्त्री जननसंस्थेमध्ये ______ ही ग्रंथी समान असते.
बहुपेशीय सजीवांमधील खालीलपैकी कोणता अलैंगिक प्रजननाचा प्रकार नाही?
अलैंगिक प्रजननात पेशीचे विभाजन ________ पद्धतीने होते.
अमिबा : विभाजन : : हायड्रा : __________
व्याख्या लिहा.
खंडीभवन
व्याख्या लिहा.
शाकीय प्रजनन
एकाच प्रजातीच्या दोन सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे अथवा नसणे हे कोणत्या बाबींवर अवलंबून असते?
एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे तीन प्रकार कोणते?
फरक स्पष्ट करा.
द्विविभाजन व बहुविभाजन