Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक सांगा.
खाणकाम आणि मासेमारी.
अंतर स्पष्ट करें
उत्तर
खाणकाम | मासेमारी | |
(१) | खाणकाम हा व्यवसाय खनिजसंपत्ती असणाऱ्या प्रदेशात केला जातो. | मासेमारी हा व्यवसाय जलसंपदा असणाऱ्या प्रदेशात केला जातो. |
(२) | हा एकमेव प्राथमिक व्यवसाय आहे, जो अक्षवृत्ते अथवा हवामान या घटकाशी निगडित नाही. | अनेक भागात पारंपरिक पद्धतीने दर्यावर्दी लोकांची संस्कृती विकसित झाली. उदा., चीन, जपान, फिलिपीन्स, पेरू, चिली. |
(३) | म्हणजेच खाणकाम व्यवसायावर अक्षवृत्तीय स्थानाचा आणि हवामानाचा प्रभाव पडत नाही. | जगात सर्वत्र मासेमारी चालते. मात्र किनारपट्टीच्या क्षेत्रात मासेमारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. |
(४) | खाणकाम विविध खनिजांसाठी केले जाते. | मासेमारी व्यवसायावर भूखंड मंच, दंतुर किनारा, नैसर्गिक बंदरांची उपलब्धता, प्लवकांची उपलब्धता, उष्ण व शीत सागरी प्रवाह यांच्या संगमाचे स्थान, हवामान आणि माशांची पैदास आणि जहाज बांधणीतील तंत्रज्ञान या घटकांचा प्रभाव पडतो. |
(५) | या खनिजांमुळे विविध उद्योगांना कच्चामाल मिळतो आणि त्यातून देशाचा आर्थिक विकास होतो. | पॅसिफिक महासागराचा वायव्य आणि ईशान्य किनारा, तसेच पूर्व किनारा मासेमारीत अग्रेसर आहे. |
(६) | खाणकामावर प्रामुख्याने भूगर्भ रचना, खडकांची निर्मिती अशा घटकांचा प्रभाव पडतो. | याशिवाय अटलांटिक महासागराचा वायव्य किनारा आणि ईशान्य किनारा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. |
shaalaa.com
प्राथमिक व्यवसाय - मासेमारी
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती
मासेमारी व प्राकृतिक घटक.
व्यापारी मासेमारीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवून सूची तयार करा.
१) डॉगर बँक मत्स्यक्षेत्र
२) आशिया खंडातील वनकटाईचे क्षेत्र
३) ऑस्ट्रेलियातील पशुपालन क्षेत्र
४) युरोपमधील शेतीखालील क्षेत्र
५) अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र
६) नैऋत्य अटलांटिकमधील मासेमारी क्षेत्र