मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

फरक सांगा. खाणकाम आणि मासेमारी. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक सांगा.

खाणकाम आणि मासेमारी.

फरक स्पष्ट करा

उत्तर

  खाणकाम मासेमारी
(१) खाणकाम हा व्यवसाय खनिजसंपत्ती असणाऱ्या प्रदेशात केला जातो. मासेमारी हा व्यवसाय जलसंपदा असणाऱ्या प्रदेशात केला जातो.
(२) हा एकमेव प्राथमिक व्यवसाय आहे, जो अक्षवृत्ते अथवा हवामान या घटकाशी निगडित नाही. अनेक भागात पारंपरिक पद्धतीने दर्यावर्दी लोकांची संस्कृती विकसित झाली. उदा., चीन, जपान, फिलिपीन्स, पेरू, चिली.
(३) म्हणजेच खाणकाम व्यवसायावर अक्षवृत्तीय स्थानाचा आणि हवामानाचा प्रभाव पडत नाही. जगात सर्वत्र मासेमारी चालते. मात्र किनारपट्टीच्या क्षेत्रात मासेमारीचे प्रमाण सर्वाधिक आहे.
(४)  खाणकाम विविध खनिजांसाठी केले जाते. मासेमारी व्यवसायावर भूखंड मंच, दंतुर किनारा, नैसर्गिक बंदरांची उपलब्धता, प्लवकांची उपलब्धता, उष्ण व शीत सागरी प्रवाह यांच्या संगमाचे स्थान, हवामान आणि माशांची पैदास आणि जहाज बांधणीतील तंत्रज्ञान या घटकांचा प्रभाव पडतो.
(५) या खनिजांमुळे विविध उद्योगांना कच्चामाल मिळतो आणि त्यातून देशाचा आर्थिक विकास होतो. पॅसिफिक महासागराचा वायव्य आणि ईशान्य किनारा, तसेच पूर्व किनारा मासेमारीत अग्रेसर आहे.
(६) खाणकामावर प्रामुख्याने भूगर्भ रचना, खडकांची निर्मिती अशा घटकांचा प्रभाव पडतो. याशिवाय अटलांटिक महासागराचा वायव्य किनारा आणि ईशान्य किनारा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे.
shaalaa.com
प्राथमिक व्यवसाय - मासेमारी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: प्राथमिक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [पृष्ठ ४१]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
पाठ 4 प्राथमिक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ५. ३) | पृष्ठ ४१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×