Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
भारतातील वाहतूक व ब्रझील वाहतूक
उत्तर
भारतातील वाहतूक | ब्राझील वाहतूक | |
1. | भारतात रस्ते वाहतुकीचे आणि लोहमार्गाचे दाट जाळे आढळते. | ब्राझीलमध्ये एकूण वाहतूक मार्गांपैकी रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणात आढळते. रस्त्यांची घनता पूर्व भागात दाट आढळून येते. |
2. | भारताच्या मध्यभागात ईशान्येकडील राज्यांत आणि राजस्थानमध्ये लोहमार्गाचे जाळे विरळ आढळते. | ब्राझीलमध्ये लोहमार्गाचा जास्त विकास झालेला नाही. |
3. | देशाच्या एकूण वाहतूक मार्गांत नद्या, कालवे, खाड्या आणि जलसाठे इत्यादी अंतर्गत जलमार्गाचा वाटा फक्त १ % आहे. | ॲमेझॉन नदीतून व्यापारी तत्त्वावर जलवाहतूक केली जाते. जगातील अंतर्गत वाहतुकीचा सर्वांत लांब पल्ला- ॲमेझॉन नदीच्या मुखापासून ते इक्वीटॉस या ठिकाणापर्यंत (सुमारे ३७०० किमी) या मार्गाने गाठता येतो. पॅराना ही दक्षिणवाहिनी नदी जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे. |
4. | ब्रझीलच्या तुलनेत भारतातील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक जास्त विकसित झाली आहे. त्याचप्रमाणे देशातील, तसेच अंतर्गत हवाई मार्गाचा व्यापारही वाढत आहे. | ब्रझीलमध्ये हवाई वाहतुकीचे योगदान कमी आहे. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे.
ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत?
खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून ३१ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता विमान निघाले आहे. हे विमान ०° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्लीमार्गे व्लॉदिवोस्टॉक क याठिकाणी जाणार आहे. ज्यावेळेस विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लॉदिवोस्टॉक येथील स्थानिकवेळ, दिवस व तारीख काय असेल ते सांगा.
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही.
भौगोलिक कारणे लिहा.
आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते.
फरक स्पष्ट करा.
ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक
ब्राझीलमधील कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात?
टिपा लिहा.
ब्राझीलमधील वाहतुक
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झाला आहे.
खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न:
- नकाशातील अति दक्षिणेकडील बंदराचे नाव लिहा.
- नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव काय आहे?
- ब्राझीलियाहून मॅनॉसला जाण्यासाठी कोणत्या वाहतूक मार्गाचा वापर करावा लागेल?
- बोआ विस्टा विमानतळ ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे?
- ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील दोन विमानतळांची नावे लिहा.
ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे ______ वाहतूक आढळते.