Advertisements
Advertisements
प्रश्न
ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे?
संक्षेप में उत्तर
उत्तर
ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचा संग्रह करणे नव्हे. संग्रह केलेल्या ग्रंथांचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे असते.
- ग्रंथांच्या पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात.
- कोणते पुस्तक नेमके कोठे ठेवले आहे, ते त्वरित सांगता येऊ शकते.
- त्यामुळे पुस्तकांचा शोध घेण्यात ग्रंथालय व्यवस्थापनाचा आणि वाचकांचा दोन्हींचाही वेळ फुकट जात नाही.
- उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांचे जतन व संवर्धनही चांगल्या प्रकारे होते. पुस्तकांचा विद्ध्वंस होत नाही.
- व्यवस्थापन जाणकार असेल; तर ग्रंथालयात उत्तम दर्जाच्या ग्रंथांचे संकलन केले जाते. त्यामुळे चोखंदळ वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात.
- एकाच प्रकारच्या विषयाच्या पुस्तकांचा संग्रह न होता विविध प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयात स्थान मिळते.
- उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांची सूची, संगणकीय प्रणाली, अन्य आधुनिक सोयी वाचकांना उपलब्ध होऊ शकतात.
- कल्पक व्यवस्थापक ग्रंथालयाचा वाचकवर्ग वाढवण्यासाठी ग्रंथांचे प्रदर्शन भरवणे, जाहिरात करणे अशा विविध मार्गांचा अवलंब करून ग्रंथालयाचा विस्तार करतात. यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन उत्तम असणे महत्त्वाचे असते.
shaalaa.com
ग्रंथालये आणि अभिलेखागार
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?