Advertisements
Advertisements
Question
ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे?
Answer in Brief
Solution
ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचा संग्रह करणे नव्हे. संग्रह केलेल्या ग्रंथांचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे असते.
- ग्रंथांच्या पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात.
- कोणते पुस्तक नेमके कोठे ठेवले आहे, ते त्वरित सांगता येऊ शकते.
- त्यामुळे पुस्तकांचा शोध घेण्यात ग्रंथालय व्यवस्थापनाचा आणि वाचकांचा दोन्हींचाही वेळ फुकट जात नाही.
- उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांचे जतन व संवर्धनही चांगल्या प्रकारे होते. पुस्तकांचा विद्ध्वंस होत नाही.
- व्यवस्थापन जाणकार असेल; तर ग्रंथालयात उत्तम दर्जाच्या ग्रंथांचे संकलन केले जाते. त्यामुळे चोखंदळ वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात.
- एकाच प्रकारच्या विषयाच्या पुस्तकांचा संग्रह न होता विविध प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयात स्थान मिळते.
- उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांची सूची, संगणकीय प्रणाली, अन्य आधुनिक सोयी वाचकांना उपलब्ध होऊ शकतात.
- कल्पक व्यवस्थापक ग्रंथालयाचा वाचकवर्ग वाढवण्यासाठी ग्रंथांचे प्रदर्शन भरवणे, जाहिरात करणे अशा विविध मार्गांचा अवलंब करून ग्रंथालयाचा विस्तार करतात. यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन उत्तम असणे महत्त्वाचे असते.
shaalaa.com
ग्रंथालये आणि अभिलेखागार
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात.
टिपा लिहा:
सरस्वती महाल ग्रंथालय
अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत?
तमिळनाडूतील तंजावर येथील ______ हे प्रसिद्ध ग्रंथालय आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा: