Advertisements
Advertisements
Question
टिपा लिहा:
सरस्वती महाल ग्रंथालय
Solution 1
- सोळाव्या-सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात तमिळनाडूमधील तंजावर येथे 'सरस्वती महाल ग्रंथालय' बांधले गेले.
- व्यंकोजीराजे भोसले यांनी १६७५ साली तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी व त्यांच्या वंशजांनी हे ग्रंथालय अधिक समृद्ध केले.
- या ग्रंथालयात सुमारे ४९००० ग्रंथ आहेत. हे प्राचीन ग्रंथ हा इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे. तत्कालीन महत्त्वाची कागदपत्रे, मोडी लिपीतील ग्रंथ, दस्तऐवज या ग्रंथालयात संग्रहित केलेले आहेत. प्राचीन इतिहासाची ती महत्त्वाची साधने आहेत.
- हे ग्रंथालय समृद्ध करण्यात सरफोजीराजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याने १९१८ मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले.
Solution 2
१. 'सरस्वती महाल ग्रंथालय' हे तमिळनाडूमधील तंजावर येथे असून इसवी सनाच्या सोळाव्या-सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळामध्ये बांधले गेले.
२. इसवी सन १६७५ मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावर जिंकून तेथे स्वत:चे स्वतंत्र राज्य स्थापन केले.
३. त्यानंतर व्यंकोजीराजे भोसले व त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाअधिक समृद्ध केले. सरफोजीराजे भोसले यांचा यात महत्त्वाचा सहभाग होता.
४. इसवी सन १९१८ मध्ये सरफोजीराजे यांच्या सन्मानार्थ या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले.
५. या ग्रंथालयामध्ये सुमारे ४९ हजार ग्रंथ संग्रहित केलेले आहेत.
RELATED QUESTIONS
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात.
ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे?
अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत?
तमिळनाडूतील तंजावर येथील ______ हे प्रसिद्ध ग्रंथालय आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा: