Advertisements
Advertisements
प्रश्न
घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे?
उत्तर
घरातील कचऱ्यात जैवविघटनशील आणि अजैवविघटनशील असे दोन्ही प्रकारचे पदार्थ असू शकतात. यातील जैवविघटनशील कचरा आपसूकच कुजला जाऊन त्यापासून विघटनाने असेंद्रिय घटक पुन्हा तयार होतात. परंतु अजैवविघटनशील पदार्थ वेगळे काढून ते पुनर्वापर किंवा पुनर्चक्रीकरण करण्यासाठी पाठवता येतील. यालाच सुका कचरा आणि ओला कचरा असेही म्हटले जाते. मात्र हे दोन्ही निरनिराळे साठवणे आवश्यक आहे. ओल्या कचऱ्याचे घरातल्या घरात देखील विघटन करता येते. त्यासाठी एखाद्या कुंडीत किंवा टाकीत ओला कचरा कंपोस्ट करण्यासाठी ठेवावा. त्यावर एखादा मातीचा पातळ थर टाकावा. हवा खेळती राहील अशा ठिकाणी ही कंपोस्ट-कंडी ठेवता येते. घरातील विघटनशील कचऱ्यात प्लास्टिकच्या वस्तू, काचा, धातूच्या वस्तू किंवा औषधे, ई-वेस्ट या वस्तूचा समावेश कधीही नसावा. विषारी पदार्थ, कीटकनाशक द्रव्ये यांमुळे विघटन योग्यरीत्या होणार नाही. तसेच आम्लता असलेल्या पदार्थांनी देखील विघटन प्रक्रियेला बाधा येते. त्यामुळे घरातील कचरा विघटन करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.