हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

जग आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले ? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जग आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले ?

संक्षेप में उत्तर

उत्तर

  1. जगाच्या आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे ठरले.
  2. सोव्हिएत रशियाचे या सुमारास विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले.
  3. भारतात पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले.
  4. 1991 मध्ये नरसिंहराव शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला. या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असे म्हणतात.
  5. भारताची आर्थिक व्यवस्था या धोरणामुळे भरभराटीस आली.
  6. भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. उद्योग, वैज्ञानिक क्षेत्रांतील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या.
  7. 1991 नंतर झालेल्या या बदलांचे वर्णन ‘जागतिकीकरण’ असेही केले जाते.
shaalaa.com
१९९१ नंतर भारतात झालेले बदल
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.02: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 1.02 भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
स्वाध्याय | Q 4. (1) | पृष्ठ ९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×