Advertisements
Advertisements
प्रश्न
‘जनी म्हणे बा विठ्ठला। जीवें न सोडीं मी तुला।।’ या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा.
उत्तर
संत जनाबाईंना श्रीविठ्ठल हृदयात कायमचा वास करावा अशी तीव्र इच्छा होती. त्यासाठी त्यांनी भक्तीचा धागा विठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्याला हृदयाच्या तुरुंगात डांबून ठेवले. शिक्षा म्हणून शब्दरचनेची बेडी त्याच्या पायात टाकली आणि 'सोहं' शब्दांचा प्रहार केला. शेवटी, श्रीविठ्ठल हृदयातून निघून जाऊ नये म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली. या शेवटच्या उपायाने तरी श्रीविठ्ठल मनात घर करून राहील अशी आशा जनाबाईंच्या मनात होती.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या शब्दासाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.
खाली दिलेल्या शब्दासाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.
जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट | ||
(१) | विठ्ठलाला धरले | (अ) | शब्दरचनेच्या जुळणीने |
(२) | विठ्ठल काकुलती आला | (आ) | भक्तीच्या दोराने |
(३) | विठ्ठलाच्या पायी घातली बेडी | (इ) | ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने |
‘सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला।।’ या ओळीतील विचार स्पष्ट करा.
(संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर) प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते सांगा.
मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत सांगा.
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा.