Advertisements
Advertisements
प्रश्न
कार्बनी संयुगांची संख्या खूप मोठी असण्यामागची कारणे काय आहेत?
उत्तर
(१) कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूंबरोबर बंध तयार करण्याची अद्वितीय क्षमता असल्याने, त्यातून मोठे रेणू तयार होतात. यामुळे कार्बनी संयुगांची संख्या वाढते. कार्बन अणूच्या या गुणधर्माला शृंखलाबंध शक्ती (Catenation Power) म्हणतात. कार्बनी संयुगांमध्ये कार्बन अणूंच्या मुक्त शृंखला किंवा बद्ध शृंखला म्हणजेच वलयाकार रचना होय. मुक्त शृंखला ही सरल शृंखला किंवा शाखीय शृंखला असू शकते. दोन कार्बन अणूंमधील सहसंयुज बंध प्रबळ असल्यामुळे तो स्थायी असतो. या स्थायी प्रबळ सहसंयुज बंधामुळे कार्बनला शृंखलाबंधन शक्ती प्राप्त होते.
(२) दोन कार्बन अणूंमध्ये एकेरी सहसंयुज बंध, दुहेरी सहसंयुज बंध व तिहेरी सहसंयुज बंध तयार होऊ शकतात. एकेरी बंधाबरोबरच बहुबंध तयार करण्याच्या क्षमतेमुळे कार्बन संयुगांची संख्या वाढते आहे. उदा., कार्बनच्या दोन अणूंपासून ईथेन (CH3 - CH3), एथीन (CH2 = CH2) व ईथाइन (CH ≡ CH) अशी तीन संयुगे तयार होतात. ज्ञात कार्बन संयुगांची संख्या सुमारे 10 दशलक्ष आहे.
(३) कार्बन हा चतुःसंयुजी असतो. जेव्हा एक कार्बन अणू चार कार्बन किंवा इतर अणूंशी बंध तयार करू शकतो; तेव्हा अनेक संयुगे निर्माण होतात. कार्बनचे ज्यांच्याशी बंध तयार झाले आहेत. त्या अणूंप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होतात. उदा., हायड्रोजन व क्लोरीन या दोन एकसंयुजी मूलद्रव्यांबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापराने पाच वेगवेगळी संयुगे तयार होतात. CH4, CH3Cl, CH2Cl2, CHCl3, CCl4.
अशाच प्रकारे अणूंचे O, N, S, halogen, P इत्यादी मूलद्रव्यांच्या अणूंबरोबर सहसंयुज बंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बनी संयुगे तयार होतात. यामुळे संयुगांची संख्या वाढते.
(४) कार्बनी संयुगांच्या संख्यावाढीला कारणीभूत असलेले आणखी एक वैशिष्ट्य कार्बनमध्ये आहे. ते म्हणजे 'समघटकता'.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तीन वेगवेगळे विषम अणू असलेले तीन क्रियात्मक गट सांगून प्रत्येकी एका उदाहरणाचे नाव व रचनासूत्र लिहा.
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.
\[\ce{CH3 – CH3 + Cl2 → CH3 – CH2Cl + HCl}\]
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.
\[\ce{CH3 – CH2 – CH2 – CH2 – OH → CH3 – CH2 – CH = CH2 + H2O}\]
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
क्रियात्मक गट
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
जोड्या जुळवा.
क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
1) | इथर | अ) | -OH |
2) | कीटोन | ब) | -O- |
3) | ईस्टर | क) | -CO- |
4) | अल्कोहोल | ड) | -COO- |
कार्बनी संयुगामध्ये कार्बन अणूंच्या फक्त मुक्तशृंखला असतात.
______ हा कार्बोक्झीलीक आम्लाचा क्रियात्मक गट आहे.