Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा.
औद्योगिकीकरण
संक्षेप में उत्तर
उत्तर
- औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान मोठ्या यंत्रांच्याद्वारे उत्पादन प्रक्रियेत वाढ झाली त्यामुळे एका बाजूस संघ पद्धतीचा ऱ्हास झाला.
- दुसऱ्या बाजूस कारखान्यांच्या संख्येत वाढ झाली आणि त्यांचा विस्तार झाला. या प्रक्रियेची साखळी युरोपमधून जगातील इतर प्रदेशांमध्ये पोचली.
- औद्योगिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे, ज्यात उपयोजित विज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञानाची प्रगती, त्याद्वारे यांत्रिक शक्तींच्या बळावर मोठ्या प्रमाणावर होणारे वस्तूंचे उत्पादन, यंत्रे आणि वस्तू या दोन्हींसाठी मोठ्या बाजारपेठा या गोष्टींचा समावेश आहे.
- औद्योगिकीकरण ही एक समाज आणि अर्थव्यवस्था यांमधील बदलाची प्रक्रिया आहे, ज्याद्वारे औद्योगिकीकरणापूर्वीच्या मानवी समाजाचे रूपांतर औद्योगिक समाजामध्ये होते.
औद्योगिकीकरणाची उदाहरणे:
- औद्योगिक क्रांती
- वस्त्रोद्योग पोलाद
- उद्योग ऑटोमोबाईल
shaalaa.com
औद्योगिकीकरण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?