हिंदी

खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. वर्णव्यवस्था - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा.

वर्णव्यवस्था

संक्षेप में उत्तर

उत्तर

  1. वैदिक कालखंडातील वर्णव्यवस्था समाजातील व्यावसायाधिष्ठित वर्गवारीवर आधारलेली होती. त्यामध्ये व्यवसायानुसार वर्ण बदलण्याइतकी लवचीकता होती.
  2. वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात मात्र यात बदल होत गेले आणि अधिक कडक निर्बंध असलेली ‘पावित्र्य व विटाळ’ या कल्पित गोष्टींवर उभारलेली जातिव्यवस्थेची उतरंड प्रस्थापित होत गेली.
  3. अन्न, पाणी यांचे प्राशन करणे, पोशाख, व्यवसाय पूजापद्धती, सामाजिक व्यवहार, प्रवास, इत्यादी सर्व गोष्टींवर या कल्पनांचा पगडा होता.
  4. उदाहरणार्थ -
    1. ब्राह्मण - पुरोहित, शिक्षक, बुद्‌धिजीवी
    2. क्षत्रिय - राज्यकर्ते आणि योद्धे
    3. वैश्य - व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी
    4. शुद्र - हीन व हलक्‍या दर्जाची कामे
  5. पहिले तीन वर्ण स्वतःला उच्च म्हणवून घेऊ लागले. फक्त त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार प्राप्त झाल्यामुळे त्यांना ‘द्विज’ म्हणजे ‘दोनदा जन्म घेतलेले’ (पहिला जन्म आईच्या पोटी, दुसरा जन्म उपनयनाच्या संस्कारातून) म्हणू लागले.
shaalaa.com
प्राचीन आणि मध्ययुगीन भारत
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×