हिंदी

खाली काही वाक्ये दिली आहेत. त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. खालील वाक्ये वाचा त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली काही वाक्ये दिली आहेत. त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. खालील वाक्ये वाचा त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. तुम्हीही याप्रमाणे वाक्ये तयार करण्याचा प्रयत्न करा.

  1. आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे, की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे.
  2. सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो. त्यात कपात केलेली मला चालत नाही.
  3. एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला. दूरध्वनीवर ते मला म्हणाले, “सर, आपण आमच्या शाळेला भेट द्या.” मी त्यांना विचारले, काय भेट देऊ?” ते शिक्षक म्हणाले, “ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा.'”
दीर्घउत्तर

उत्तर

  1. सर = शिक्षक
    सर न येणे = तुलना नसणे
  2. कपात = चहाच्या प्याल्यात
    कपात = कमी
  3. भेट देणे = जाऊन पहाणे
    भेट = नजराणा 

याप्रमाणे वाक्य:

  1.  रत्नाचा हार गळ्यात घालणाऱ्या राजकुमाराने लढाईत कधी हार मानली नाही. 
    • हार = माळ
    • हार = पराभव
  2. नाव चालवणाऱ्या नावाड्याचे नाव काय?
    • नाव = होडी
    • नाव = नाम
  3. मान झुकवून थोरामोठ्यांना मान द्यावा.
    • मान = शरीराचा अवयव
    • मान = सन्मान; आदर
  4. मी पांढर्‍या पानावर हिरव्या पानाचे चित्र काढले.
    • पानावर = वहीचे पान
    • पानाचे = झाडाचे पान 
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.4: कवितेची ओळख - खेळ खेळूया. [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 1.4 कवितेची ओळख
खेळ खेळूया. | Q (आ) | पृष्ठ १९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×