Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली काही वाक्ये दिली आहेत. त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. खालील वाक्ये वाचा त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. तुम्हीही याप्रमाणे वाक्ये तयार करण्याचा प्रयत्न करा.
- आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे, की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे.
- सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो. त्यात कपात केलेली मला चालत नाही.
- एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला. दूरध्वनीवर ते मला म्हणाले, “सर, आपण आमच्या शाळेला भेट द्या.” मी त्यांना विचारले, काय भेट देऊ?” ते शिक्षक म्हणाले, “ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा.'”
दीर्घउत्तर
उत्तर
- सर = शिक्षक
सर न येणे = तुलना नसणे - कपात = चहाच्या प्याल्यात
कपात = कमी - भेट देणे = जाऊन पहाणे
भेट = नजराणा
याप्रमाणे वाक्य:
- रत्नाचा हार गळ्यात घालणाऱ्या राजकुमाराने लढाईत कधी हार मानली नाही.
- हार = माळ
- हार = पराभव
- नाव चालवणाऱ्या नावाड्याचे नाव काय?
- नाव = होडी
- नाव = नाम
- मान झुकवून थोरामोठ्यांना मान द्यावा.
- मान = शरीराचा अवयव
- मान = सन्मान; आदर
- मी पांढर्या पानावर हिरव्या पानाचे चित्र काढले.
- पानावर = वहीचे पान
- पानाचे = झाडाचे पान
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?