Advertisements
Advertisements
प्रश्न
वाक्य म्हणजे काय, हे आपण अभ्यासले आहे. वाक्यांचे विविध प्रकार आहेत. त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत.
(१) विधानार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) माझे घर दवाखान्याजवळ आहे.
(आ) तो रोज व्यायाम करत नाही.
या प्रकारच्या वाक्यांत केवळ विधान केलेले असते.
(२) प्रश्नार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) तुला लाडू आवडतो का?
(आ) तुम्ही सकाळी कधी उठता?
या प्रकारच्या वाक्यांत प्रश्न विचारलेला असतो.
(३) उद्गारार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) अरेरे! फार वाईट झाले.
(आ) शाबास! चांगले काम केलेस.
या प्रकारच्या वाक्यांत भावनेचा उद्गार काढलेला असतो.
(४) आज्ञार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) मुलांनो, रांगेत चला.
(आ) उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा.
या प्रकारच्या वाक्यांत आज्ञा किंवा आदेश असतो.
वर दिलेल्या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.
व्याकरण
उत्तर
- विधानार्थी वाक्ये:
- काल खूप पाऊस पडला.
- गुलाबाचे फूल सुंदर आहे.
- प्रश्नार्थी वाक्य:
- काल किती पाऊस पडला?
- कोणते फूल सुंदर आहे?
- उद्गारार्थी वाक्य:
- बापरे! किती पाऊस पडला काल!
- अहाहा! किती सुंदर गुलाब हा!
- आज्ञार्थी वाक्य:
- छत्री घेऊन जा.
- तो गुलाब मला दे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?