Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. वरील आकृतीत दर्शवलेले यंत्र ओळखा.
ब. या यंत्राचे कार्य कोणत्या तत्त्वावर आधारित आहे?
क. या यंत्राचे कार्य स्पष्ट करा.
ड. या यंत्राचा उपयोग लिहा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
अ. आकृतीत दर्शवलेले यंत्र प्रत्यावर्ती विद्युतधारा जनित्र आहे.
ब. विद्युतजनित्राची कार्यप्रणाली विद्युतचुंबकीय प्रवर्तनाच्या तत्त्वावर आधारित असते. विद्युतजनित्रातील कुंडल जेव्हा चुंबकीय क्षेत्रातून फिरते तेव्हा ते चुंबकीय क्षेत्र या कुंडलात विद्युतधारा प्रवर्तित करते. ही प्रवर्तित विद्युतधारा, नंतर कुंडलाला जोडलेल्या परिपथात जाते.
क. विद्युतजनित्राचे कार्य -
- जेव्हा बाहेरील यंत्राच्या साहाय्याने आस फिरवला जातो, तेव्हा ABCD हे कुंडल फिरायला सुरुवात होते.
- आस फिरला, की कुंडलाची AB शाखा वरच्या दिशेला आणि CD शाखा खालच्या दिशेला फिरते. त्यामुळे, ABCD हे कुंडल घड्याळाच्या काट्यांच्या दिशेप्रमाणे फिरते.
- फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार विद्युतधारा `"A"→"B"→"C"→"D"` या दिशेने वाहते. त्यामुळे, गॅल्व्हॅनोमीटरच्या माध्यमातून बाहेरील परिपथात विद्युतधारा B2 कडून B1 कडे वाहते.
- अर्धपरिवलनानंतर शाखा AB व CD च्या जागांची अदलाबदल होते व प्रवर्तित विद्युतधारा `"D"→"C"→"B"→"A"` अशी वाहू लागते.
- शाखा BA ब्रश B1 च्या, तर शाखा DC ब्रश B2 च्या संपर्कात असल्याने, बाहेरील परिपथात प्रवाहित होणारी विद्युतधारा B1 कडून B2 कडे, म्हणजेच आधीच्या अर्धपरिवलनाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने वाहते.
- प्रत्येक अर्धपरिवलनानंतर वरील प्रक्रियेची पुनरावृत्ती होते. अशाप्रकारे, प्रत्यावर्ती विद्युतधारा जनित्र प्रत्यावर्ती धारा निर्माण करते.
ड. विद्युतजनित्राचा उपयोग: वीजनिर्मिती प्रकल्प, विद्युत कॉफी मशीन.
shaalaa.com
विद्युत जनित्र (Electric Generator)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?