Advertisements
Advertisements
प्रश्न
रचना व कार्य सांगा, व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या.
विद्युतजनित्र (प्रत्यावर्ती)
उत्तर
विद्युतधारा जनित्र (प्रत्यावर्ती)
रचना : आकृती मध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारा जनित्र ची (AC जनरेटर ची) रचना दाखवली आहे. यात ABCD हे आसाभोवती फिरणारे तांब्याच्या तारेचे कुंडल शक्तिशाली चुंबकाच्या दोन (N व S) ध्रुवांमध्ये ठेवलेले असते.
कुंडलाची दोन टोके R1 व R2 या दोन विद्युतवाहक कड्यांना B1 व B2 या कार्बन ब्रशांमार्फत जोडलेली असतात. ही कडी आसाला (अक्षाला) धरून बसलेली असतात, पण कडी व आस यांमध्ये विद्युतरोधी आवरण असते. B1 व B2 यांची टोके गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेली असतात. गॅल्व्हॅनोमीटर (G) परिपथातील विद्युतधारेची दिशा दाखवतो.
कार्य : आस बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो. जेव्हा ABCD हे कुंडल शक्तिशाली चुंबकाने निर्माण केलेल्या चुंबकीय क्षेत्रातून फिरते, तेव्हा ते चुंबकीय बल रेषांना छेदते. अशा प्रकारे बदलत जाणारे चुंबकीय क्षेत्र कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित करते. या प्रवर्तित विद्युतधारेची दिशा फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे ठरवली जाते. AD या बाजूने पाहिल्यास कुंडल घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरते. एका अर्ध्या फेरीत AB ही बाजू वर जाते व CD ही बाजू खाली जाते. या वेळी विद्युतधारेची दिशा A → B → C → D अशी असते व बाह्य परिपथातील विद्युत धारा B2 → G → B1 अशी वाहते. अर्ध्या परिवलनानंतर CD ही बाजू AB या बाजूची जागा घेते व AB ही बाजू CD या बाजूची जागा घेते. या वेळी विद्युतधारा D → C → B → A → अशी वाहते. पण CD ही बाजू ब्रश B2 च्या संपर्कात व AB ही बाजू ब्रश B1 च्या संपर्कात असल्याने बाह्य परिपथात विद्युतधारा B1 → G → B2 अशी वाहते.
ही क्रिया नियमितपणे पुन:पुन्हा घडते. अशा प्रकारे ही प्रवर्तित विद्युत धारा प्रत्यावर्ती स्वरूपाची असल्याने तिला प्रत्यावर्ती विद्युतधारा (AC) म्हणतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.
खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. वरील आकृतीत दर्शवलेले यंत्र ओळखा.
ब. या यंत्राचे कार्य कोणत्या तत्त्वावर आधारित आहे?
क. या यंत्राचे कार्य स्पष्ट करा.
ड. या यंत्राचा उपयोग लिहा.
विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास ______ म्हणतात.