Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.
`2/x + 2/(3y) = 1/6; 3/x + 2/y = 0`
उत्तर
दिलेली एकसामयिक समीकरणे,
`2/x + 2/(3y) = 1/6` ....(i)
`3/x + 2/y = 0` .....(ii)
समजा, `1/x` = p आणि `1/"y"` = q
∴ समीकरण (i) आणि (ii) पुढीलप्रमाणे होतील,
`2p + 2/3q = 1/6`
∴ 6p + 2q = `1/2` ...(iii) [दोन्ही बाजूंना ३ ने गुणून]
3p + 2q = 0 ....(iv)
समीकरण (iii) मधून समीकरण (iv) वजा करून,
6p + 2q = `1/2`
3p + 2q = 0
- - -
3p = `1/2`
∴ p = `1/6`
p = `1/6` ही किंमत समीकरण (iv) मध्ये ठेवून,
3p + 2q = 0
`3(1/6) + 2q = 0`
∴ `1/2` + 2q = 0
∴ 2q = `- 1/2`
∴ q = `- 1/4`
∴ (p, q) = `(1/6, - 1/4)`
p आणि q च्या किमती परत ठेवून,
`1/6 = 1/x` आणि `- 1/4 = 1/y`
∴ x = 6 आणि y = - 4
∴ (x, y) = (6, -4) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
5m - 3n = 19; m - 6n = -7
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
`1/3"x" + "y" = 10/3; 2"x" + 1/4"y" = 11/4`
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.
`7/(2x + 1) + 13/(y + 2) = 27; 13/(2x + 1) + 7/(y + 2) = 33`
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.
`(7x - 2y)/(xy) = 5; (8x + 7y)/(xy) = 15`
2x - y = 2 या समीकरणाची उकल ______ आहे.
5x + 3y = 6 या समीकरणाची (0, 2) ही उकल आहे का? ते ठरवा.
जर x + 2y = 5 आणि 2x + y = 7 असल्यास x + y ची किंमत काढा.
खालील समीकरणामध्ये x ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा.
3x + 2y = 11 ....................(1) आणि
2x + 3y = 4 ....................(2)
कृती: समीकरण (1) ला `square` ने आणि समीकरण (2) ला `square` ने गुणू.
3 × (3x + 2y = 11) ∴ 9x + 6y = 33 .............(3)
2 × (2x + 3y = 4) ∴ 4x + 6y = 8 ...............(4)
समीकरण (3) मधून समीकरण (4) वजा करू,
5x = `square`
∴ x = `square`
जर (2, -5) ही 2x - ky = 14 या समीकरणाची उकल असेल, तर k = ?
जर (0, 2) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा:
कृती:
(0, 2) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल आहे.
∴ x = `square` आणि y = `square` या किंमती दिलेल्या समीकरणात ठेवून.
∴ 2 × `square` + 3 × 2 = k
∴ 0 + 6 = k
∴ k = `square`