Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर
पावसाळ्यातील एक दिवस
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले...
कवी बा. भ. बोरकरांच्या या काव्यपंक्तींनी मनात घर केलं होत. बाहेर अंधारून आले होते. मी खिडकीतून बाहेर पाहत होते. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. सूं सूं करत वारा थैमान घालू लागला. वादळ येईल की काय अशी शंका मनात येत होती, तितक्यात दार जोरात बंद झाल्याचा आवाज आला. आमच्या घरासमोरून दिसणाऱ्या थोड्या अंतरावरच्या मैदानात धुळीचा लोट आकाशात उडाला, भोवऱ्यासारखा गोलाकार घुमत घुमत खाली आला आणि त्याने आपले अंग भसकन जमिनीवर लोटून दिले. सर्वत्र पालापाचोळा उडाला. अचानक आकाशात लख्खकन् वीज सळसळली आणि टपोऱ्या थेंबांचा वर्षाव सुरू झाला.
मातीचा सुगंध आसमंतात दरवळला आणि त्या थंडगार सरींचा स्पर्श अनुभवण्यासाठी माझे हात नकळत खिडकीबाहेर सरसावले. हातावर पडणारे मोती झेलत, उधळत किती वेळ घरात राहणार? मग बिनधास्तपणे प्रत्यक्ष पाऊस अंगावर घेण्यासाठी बाहेर मोकळ्या वातावरणात आलो.
छपरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी छान ताल धरला होता. मी त्या पावसात अगदी मनसोक्त भिजलो. आनंदाने गाणी गायिली. चिखलात उड्या मारल्या. माझ्यासोबत आजूबाजूची झाडेही पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत होती. संपूर्ण वातावरण हिरवे गार झाले होते. ढगांनी आपली सर्व पोतडी भरभरून धरेवर लोटून दिली होती जणू! वातावरण चैतन्यमय झाले होते. थकलेल्या, कंटाळलेल्या मनाला या सरींच्या शिडकाव्याने उल्हसित केले होते. हे अविस्मरणीय क्षण मनात साठवत, पावसाचे मुक्त, बरसणारे रूप अनुभवत माझी पावले घराच्या दिशेने वळली. जणू 'श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीमधारा। उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा।' असा प्रत्यय मी आज अनुभवला होता!
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.
नमुना कृती.
नमुना कृती:
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझे आवडते शिक्षक
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.
विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!
खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी अनुभवलेला पाऊस
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
माझा आवडता खेळाडू
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी फळा बोलतोय
‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
साधना विद्यालय, धुळे इयत्ता दहावी- शुभेच्छा समारंभ दि. ४ फेब्रुवारी स. १० वाजता अध्यक्ष - श्री. रमाकांत धुमाळ प्रमुख पाहणे - श्री. अजय साठे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.