हिंदी

पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

अविस्मरणीय पारितोषिक वितरण समारंभ

दिनांक २२ डिसेंबर ... हो, याच दिवशी संध्याकाळी ४ वाजता आमच्या ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम होता. आम्ही सर्व मित्रमंडळी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या आमच्या लाडक्या मित्राचे – आनंदचे अभिनंदन करण्याकरता अर्धा तास आधीच शाळेच्या पटांगणावर जमलो.

कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू झाला. प्रमुख पाहुण्यांचे व अध्यक्षांचे स्वागत मुख्याध्यापकांच्या हस्ते झाले. स्वागतगीत, ईशस्तवन झाल्यानंतर प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. यानंतर आम्हांला प्रतीक्षा होती त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. शालेय, आंतरशालेय स्पर्धांतील पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांची नावे घेतली जाऊ लागली, तसतसे ते ते विद्यार्थी आपल्या आसनावरून उठून बक्षीस घेऊन येऊ लागले. टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.

आणि अचानक एक क्षण पटांगणावर शांतता पसरली. मुख्याध्यापक व्यासपीठावरून उठले आणि त्यांनी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आमच्या शाळेची कीर्ती प्रस्थापित करणाऱ्या आनंदविषयी कौतुकोद्गार काढत त्याला व्यासपीठावर बोलावले. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होत होता. आम्ही मित्रही आमच्या आनंदला प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्या व शाळेच्या नावाने आरोळ्या ठोकत होतो. ज्या क्षणी सन्मानचिन्ह देऊन आनंदचा गौरव केला गेला तेव्हा सर्वांनी एकच जल्लोष केला.

इतका सन्मान मिळूनही आनंदचे पाय मात्र जमिनीवरच होते. बक्षीस स्वीकारल्यानंतर आभार मानण्यासाठी माईक हातात धरून तो बोलू लागला. वास्तविक, अत्यंत कष्टमय परिस्थितीतून त्याने हे यश संपादन केले होते; पण त्या कष्टांचा अजिबात बाऊ न करता किंवा स्वत:च्याच मुखाने स्वत:च्या मेहनतीचे पाढे न वाचता आनंदने आपल्या आईचे, शिक्षकांचे, आम्हां मित्रांचे आभार मानले. आपल्या यशाचे सारे श्रेय त्याने अशाप्रकारे सर्वांत वाटून टाकले. तितक्याच नम्रतेने सर्व प्रमुख पाहुणे, व्यासपीठ व उपस्थितांना लवून नमस्कार करून तो जेव्हा खाली उतरला तेव्हा त्याच्या या गुणाचे कौतुक खुद्द प्रमुख पाहुण्यांनी केले. हा लाडका मित्र भविष्यातही अशीच प्रगती करत राहावा ही सदिच्छा मनाशी बाळगत आम्ही कार्यक्रम संपताच घरी परतलो.

shaalaa.com
निबंध लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 16.3: उपयोजित लेखन - लेखन कौशल्य [पृष्ठ ७८]

APPEARS IN

बालभारती Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 16.3 उपयोजित लेखन
लेखन कौशल्य | Q १ | पृष्ठ ७८

संबंधित प्रश्न

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

व्यक्तिचित्रणात्मक निबंध

माझा आवडता कलावंत.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


केल्याने देशाटन

महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे

‘गिर्यारोहण कॅम्प’

विशेष ‘गौरव’ सोहळा

वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

हुंडा-एक सामाजिक समस्या


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

लोकशाही आणि निवडणुका


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी अनुभवलेला पाऊस


'माझा आवडता लेखक/कवी' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×