Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळी वाचा व समजून घ्या.
उदा., ‘‘नित्याचेच दु:ख होते
उशागती बसलेले
... तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार।’’ (कृ. ब. निकुम्ब)
- वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या?
- अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात?
- अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का?
उत्तर
- वरील ओळींमधील अचेतन गोष्टी म्हणजे नित्याचे दु:ख आणि सुख.
- अचेतन गोष्टी अवचित आले आणि दार ठोठावीत क्रिया करतात.
- अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
अभ्यासाचे डोंगर पेलणे-
अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.
सुट्टीत तो मित्रांशी खेळतो.
खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.
‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.
रोजगार-
खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.
बोट-
दिलेल्या शब्दापुढे पर्यायातील विरुद्धार्थी शब्द लिहा.
मोठे × ______
खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.
______ बाळाला मांडीवर घेतले.
वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर
खरे - खारे
खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
तृप्त × ______
असे तीन अक्षरी शब्द शोधा, ज्यांच्या मधले अक्षर 'रं' आहे. त्यांची यादी करा.
उदा., करंजी, चौरंग, कारंजे, ......
हे शब्द असेच लिहा.
स्त्रिया, संस्कृत, वक्ता, संदर्भ, विद्वान, ख्याती, पराङ्मुख, दु:ख, श्रमप्रतिष्ठा, संघर्ष, दीर्घ, सहस्रक, आयुष्य.
कुंदाचा पाय मुरगळला ________ ती शाळेत येऊ शकली नाही.
एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचं आणि काम झालं, की त्याला सोडून द्यायचं. - ______
खालील तक्ता पूर्ण करा.
शब्द | मूळ शब्द | लिंग | वचन | सामान्य रूप | विभक्ती प्रत्यय | विभक्ती |
(१) कागदपत्रांचे | ______ | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(२) गळ्यात | ______ | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(३) प्रसारमाध्यमांनी | ______ | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(४) गिर्यारोहणाने | ______ | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.
ते झाड उंच ______.
खालील शब्दाचे लिंग ओळखा.
मेळा - ______
अनुस्वार वापरून लिहा.
बम्ब - ______
खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., ‘अमृताहुनि गोड नाम तुझे देवा’
वरील उदाहरणातील उपमेय - ______
उपमान - ______
खालील शब्द वाचा.
चिंच, लिंबू, बिंदू, तुरुंग, उंच, लिंग, अरविंद, अरुंधती, दिंडी, पिंड, किंकाळी, चिंता, पिंड, पुरचुंडी, पुंगी, धुंद, चिंधी
वरील शब्द अनुस्वारयुक्त आहेत. यांतील अनुस्वारयुक्त अक्षराकडे नीट पाहिल्यास काय जाणवते? शब्द मराठी असो वा तत्सम. अनुस्वारयुक्त अक्षरे ऱ्हस्व आहेत.
मराठी व तत्सम शब्दांतील इकारयुक्त व उकारयुक्त अक्षरांवर अनुस्वार असल्यास सामान्यत: ती ऱ्हस्व असतात, म्हणजेच ह्या अनुस्वारयुक्त अक्षरातील इकार, उकार ऱ्हस्व असतात.
वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.