Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळींचे रसग्रहण करा.
दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो.
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.
उत्तर
‘ऐसा गा मी ब्रह्म!’ या काव्यसंग्रहातील ‘दोन दिवस’ ही कविता नारायण सुर्वे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवीने कामगारांच्या जीवनातील वास्तव परिस्थितीचे वर्णन केले आहे. रोजच्या पोटापाण्याच्या चिंतेत असणाऱ्या व अतोनात कष्ट करताना दुःखाशी सामना करत आपले जीवन जगणाऱ्या कामगारांची व्यथा या कवितेत वर्णिली आहे.
कवी नारायण सुर्वे कष्टकऱ्यांच्या दुःखाचे वर्णन करताना असे सांगतात की आयुष्य हे दुःखाने भरलेले आहे पण हे विचार मांडताना जगाच्या या शाळेत दु:ख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळते हे स्पष्ट करताना म्हणतात दुःख पचवून उमेदीने जगण्याचे शिक्षणही येथेच मिळते.
या कष्टकऱ्यांप्रमाणेच आपणही आपल्या जीवनात येणारे दुःख, अडचणी, संकटे यावर मात करून त्यातून वाट काढत आयुष्य नव्याने जगायला हवे असा संदेश या कवितेत दिला आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील ओळींचे रसग्रहण करा.
दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.
कृती पूर्ण करा.
कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
एका शब्दांत उत्तर लिहा.
कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - ______
एका शब्दांत उत्तर लिहा.
कवीचा जवळचा मित्र - ______
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
माना उंचावलेले हात
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
कलम केलेले हात
'दु:ख पेलावे आणि पुन्हा जगावे', या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.
'कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात -
खाली कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)
1) आकृती पूर्ण करा. (०२)
१. चौकटी पूर्ण करा. (०१)
१. कवींनी पोलादाची उपमा कशाला दिली -
२. कवींची जिंदगी काय करण्यात बरबाद झाली -
२. आकृती पूर्ण करा. (०१)
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली; भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. |
2) कृती पूर्ण करा. (०२)
- 'अथक व अखंड कष्ट करूनही आयुष्यभर गरिबीतच राहावे लागले' या आशयाची कवितेतील ओळ शोधा.
- 'झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
3) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)
१. जग -
२. जिंदगी -
३. मित्र -
४. दिवस -
4) खाली दिलेल्या ओळींचे आशय साैंदर्य स्पष्ट करा. (०२)
“दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले,
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे”
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. चौकटी पूर्ण करा. (2)
- दोन दिवस वाट पाहण्यात गेले; तर दोन गेले - ______
- भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी झाली - ______
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- गहाण -
- डोईवर -
- झेतभट्टी -
- धुंद -
४. काव्या सौंदर्य: (2)
“दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलों”