हिंदी

खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा. कलम केलेले हात - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

कलम केलेले हात

टिप्पणी लिखिए

उत्तर

कलम करणे म्हणजे छाटणे, घाव घालून तोडणे. प्रस्तुत शब्दसमूहातून कवीच्या हातांना नवनिर्मिती करण्यापासून रोखले गेले किंवा त्यांच्या नवनिर्मितीची, काव्यप्रतिभेची, सृजनशक्तीची कोंडी झाली, त्यांच्या हातांना उपेक्षा सहन करावी लागली असा अर्थ व्यक्त होतो.

shaalaa.com
दोन दिवस
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: दोन दिवस - कृती [पृष्ठ १८]

APPEARS IN

बालभारती Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 5 दोन दिवस
कृती | Q (३)(आ) | पृष्ठ १८

संबंधित प्रश्न

खालील ओळींचे रसग्रहण करा. 

दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.


कृती पूर्ण करा.

‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत’ या आशयाची कवितेतील ओळ शोधा.


कृती पूर्ण करा.

कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा.


एका शब्दांत उत्तर लिहा.

कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - ______


'दु:ख पेलावे आणि पुन्हा जगावे', या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.


खाली कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)

1) आकृती पूर्ण करा. (०२)

१. चौकटी पूर्ण करा. (०१)

१. कवींनी पोलादाची उपमा कशाला दिली -

२. कवींची जिंदगी काय करण्यात बरबाद झाली -

२. आकृती पूर्ण करा. (०१)

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो

दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

2) कृती पूर्ण करा. (०२)

  1. 'अथक व अखंड कष्ट करूनही आयुष्यभर गरिबीतच राहावे लागले' या आशयाची कवितेतील ओळ शोधा.
  2. 'झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

3) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. जग - 

२. जिंदगी -

३. मित्र -

४. दिवस -

4) खाली दिलेल्या ओळींचे आशय साैंदर्य स्पष्ट करा. (०२)

“दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले,

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे”


खालील ओळींचे रसग्रहण करा.

दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो.
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.


खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.

मुद्दे ‘दोन दिवस’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘झोतभट्टीत शेकावे पोलाद। तसे आयुष्य छान शेकले।।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) वाळविले -
(ii) पेलावे - 
(iii) हरघडी - 
(iv) अगा -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘दोन दिवस’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. ‘हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले’
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. (i) जिंदगी -
(ii) बरबाद - 
(iii) हरघडी - 
(iv) दुनिया - 

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×