Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
कार्ल युंगचा व्यक्तिमत्त्व सिद्धांत स्पष्ट करा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
कार्ल युंग यांचा व्यक्तिमत्व सिद्धातं हा वर्गतत्व दृष्टिकोनावर आधारित असणाऱ्या व्यक्तिमत्त्व सिद्धांतापैकी एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. कार्ल युंग या स्विस मानसशास्त्रज्ञाने बोधात्मक गुणवैशिष्टयांच्या आधारे व्यक्तिमत्त्वाचे अंतर्मुखी व बहिर्मुखी असे वर्गीकरण केले.
- अंतर्मुखी: अंतर्मुखी व्यक्ती या अंतर्गत घटकांनी प्रेरित होतात. या व्यक्ती लाजाळू व अबोल असतात. या व्यक्ती एकटे राहणे पसंत करतात व सामाजिक संपर्क टाळतात.
- बहिर्मुखी: बहिर्मुख व्यक्ती बाह्य घटकांनी प्रेरित होतात. अशा व्यक्ती समाजप्रिय असतात. त्यांना इतरांमध्ये मिसळायला आवडते व इतरांच्या नेहमी संपर्कात राहता येईल अशा प्रकारची कामे करायला त्यांना आवडते.
shaalaa.com
व्यक्तिमत्त्व अभ्यासाचे दृष्टीकोन - कार्लयुंग यांचा व्यक्तिमतत्व सिद्धांत
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?