Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे उत्तर सोदाहरण स्पष्ट करा.
वनस्पतींकडून सर्वोच्च भक्षकाकडे ऊर्जेचा प्रवाह जाताना ऊर्जेच्या प्रमाणामध्ये काय फरक पडतो?
उत्तर
परिसंस्थेतील हरित वनस्पती एकूण सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. अन्न साखळीत अनेक ऊर्जा विनिमय स्तर असतात. ऊर्जा विनिमय स्तर रचनेत ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा कमी कमी होत जाते. तसेच सजीव संख्या सुद्धा निम्नस्तराकडून उच्चस्तराकडे कमी कमी होत जाते. विघटकांकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही म्हणून ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते. म्हणून, ऊर्जा मनोरेच्या पायथ्याशी सर्वात मोठी असते आणि शिखरावर कमीतकमी असते. उदाहरणार्थ, मनोरेच्या शिखरावर असलेल्या मानवांमध्ये 10 kcal ऊर्जा असते, तर मनोरेच्या पायथ्याशी असलेल्या वनस्पती (प्लवक) मध्ये 10,000 kcal ऊर्जा असते.