Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
हरसाल -
उत्तर
हरसाल - प्रत्येक वर्षी
संबंधित प्रश्न
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
कडेलोट होणे -
खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
अवाक् होणे-
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.
चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही.
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.
दिलेल्या शब्दापुढे पर्यायातील विरुद्धार्थी शब्द लिहा.
मऊमऊ × ______
खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत. त्यांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.
उदा.,
- तुषार गुणी आहे.
- तो पिवळा चेंडू खेळतो.
- तुषारला मिठाई आवडते.
खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.
सुमनने गुलाबाचे रोपटे लावले.
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
मी त्यांना सुविचार सांगितला.
खालील शब्दाचे वचन बदला.
पुस्तक -
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
लवकर ×
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.
योग्य जोड्या लावा.
नाम | विशेषण |
(अ) मिनू | (१) मुसळधार |
(आ) पाणी | (२) इवलीशी |
(इ) डोळे | (३) खारट |
(ई) पाऊस | (४) बटबटीत |
खालील वाक्यातील काळ ओळखा.
मी गावाला जाईन -
खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.
बिजागरी -
विरुद्धार्थी शब्द लिहा.
निकृष्ट ×
दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा.
चंदाने लाडू खाऊन संपवला. (वाक्य वर्तमानकाळी करा.)
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.
छत्तीसचा आकडा -
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उंटावरचा शहाणा -
जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता. वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप ______ होता.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे.
खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
सज्जन × ______
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
आमूलाग्र -
खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.
मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.
उदा.,
- टेप आणा आपटे.
- तो कवी ईशाला शाई विकतो.
- ती होडी जाडी होती.
- हाच तो चहा.
- सर जाताना प्या ताजा रस.
- काका, वाचवा, काका.
तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.
सर्वत्र/सगळीकडे परिस्थिती समान असणे. - ______
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
थांबणे ×
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
जन्म × ______
खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.
कोरणे
खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.
अनाथ ×
खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.
पुरोगामी ×
खालील ओळी वाचा व समजून घ्या.
उदा., ‘‘नित्याचेच दु:ख होते
उशागती बसलेले
... तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार।’’ (कृ. ब. निकुम्ब)
- वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या?
- अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात?
- अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का?
खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.
आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला
खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.
हुबेहूब - ______
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
तिच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला.
खालील शब्द वाचा.
कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, शिस्त, दुष्काळ, पुस्तक, चिठ्ठी, डुक्कर, बिल्ला, चिक्की.
वरील प्रत्येक उदाहरणात एक जोडाक्षर आहे. या जोडाक्षरयुक्त अक्षरापूर्वीच्या अक्षराचे नीट निरीक्षण करा. काय आढळले? या अक्षरांतील उकार, इकार हे ऱ्हस्व आहेत.
मराठी शब्दांत जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचे इकार, उकार, सामान्यत: ऱ्हस्व असतात.
लक्षात ठेवा: तत्सम शब्दांतील जोडाक्षरापूर्वीचे इकार व उकार ऱ्हस्व व दीर्घ अशा दोन्ही प्रकारचे आढळतात.
उदा., पुण्य, तीक्ष्ण, पूज्य
वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.