Advertisements
Advertisements
प्रश्न
कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा. त्याचे विविध भाग अभ्यासा व त्याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहून आकृती काढा.
आकृति
दीर्घउत्तर
उत्तर
फुलाला लांब किंवा आखूड देठ (Pedicel) असतो.
देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते, तो भाग सामान्यतः पसरणारा व फुगीर असतो. त्याला पुष्पाधार (Receptacle) असे म्हणतात. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात.
- निदलपुंज: कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज होय.
- दलपुंज: दलपुंज पाकळ्यांनी (Petals) बनलेले असते. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कण्हेर या फुलांचे दलपुंज पाकळ्यांनी बनलेले असते.
- पुंकेसर: फुलाचा हा पुंलिंगी भाग असून तो पुंकेसराचा (Stamen) बनलेला असतो. त्यात परागकोष व वृंत असतात.
- जायांग: फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसराचा (Carpel) बनलेला असतो. स्त्रीकेसरचे मुख्य घटक पुढीलप्रमाणे आहेत:
- कुक्षीवृंत: तो कुक्षी (Stigma) ला अंडाशयाशी (Ovary) जोडतो.
- कुक्षी: हा परागकण ग्रहण करण्यासाठी एक आधार म्हणून कार्य करतो.
- अंडाशय: हा फुलाचा विस्तृत तळभाग असतो, ज्यावर कुक्षीवृंत असतो. प्रत्येक अंडाशयात एक किंवा अधिक बीजांड (Ovules) असतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?