हिंदी

कुपोषण ही एक खूप मोठी समस्या आहे. आदिवासी, दुर्गम भागांत या समस्येचे भयावह स्वरूप पाहायला मिळते. आंतरजालावरून या समस्येची खालील प्रश्‍नांच्या आधारे माहिती करून घ्या. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कुपोषण ही एक खूप मोठी समस्या आहे. आदिवासी, दुर्गम भागांत या समस्येचे भयावह स्वरूप पाहायला मिळते. आंतरजालावरून या समस्येची खालील प्रश्‍नांच्या आधारे माहिती करून घ्या.

  1. ही समस्या का निर्माण होते?
  2. या समस्येच्या निराकरणासाठी कोणकोणत्या संस्था कार्य करत आहेत?
  3. या संस्था कोणत्या स्वरूपाचे काम करतात?
  4. तुमच्या परिसरात एखादे कुपोषित बालक तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही त्याच्यासाठी काय कराल, ते लिहा.
विस्तार में उत्तर

उत्तर

  1. अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्त्वांचा अभाव या कारणांनी ही समस्या निर्माण होते.
  2. महिला व बालविकास विभाग, आदिवासी विकास संस्था, राजमाता जिजाऊ बाल आरोग्य आणि पोषण मिशन, युनिसेफ, रचना संस्था, साथी सेहत संस्था, जन आरोग्य अभियान, अन्न अधिकार अभियान, या व्यतिरिक्त मेळघाट सारख्या व इतर भागांत हजारो स्वयंसेवी संस्था कुपोषण निराकरणासाठी कार्य करत आहेत.
  3. आधी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आशा यांना प्रशिक्षण देतात. कुटुंबांची पोषणाबाबतची जागृती करण्यासाठी उपलब्ध सर्व माध्यमांचा वापर करण्यात येतो. पोषणयुक्त आहार कसा घ्यायचा, गरोदरपणात काळजी कशी घ्यायची, स्तनपान या सगळ्याची माहिती देण्यासाठी ऑडिओ- व्हिडीओ, तसेच मोबाईल संदेश, अंगणवाडीत व्हिडीओ दाखवणारे मोबाईल उपलब्ध करून देणे, लॅपटॉप, व्हीसीआर उपलब्ध करून देणे. आदिवासी भागात हे सगळे संदेश त्या त्या स्थानिक भाषेत असावीत याकडे लक्ष दिल्या जाते. एकीकडे या आधुनिक साधनांचा वापर, तर दुसरीकडे कीर्तन, कला पथक, पथनाटय, शाहिरी, आषाढी वारीत चित्ररथयात्रा, गावात विशेष दिनांना प्रभात फेरी या सगळ्यांतून पोषणासंदर्भातले संदेश, माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. 
  4. सुरूवातीला त्या भागातील अंगणवाडीला भेट देईन. अंगणवाडी सेविकेकडून बालकाची पूर्ण माहिती घेईन. त्याची कौटुंबिक माहिती मिळवेण. त्याचे कुपोषित होण्याचे कारण समजून घेईन. जर घरातील आर्थिक ते बालक कुपोषित झाले असेल तर त्याला आर्थिक मदत करेन. गरज पडल्यास स्थानिक स्वयंसेवी संस्थांकडून मदत घेईन. आरोग्यविषयक समस्या असेल तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना समजावून सांगेल आणि त्याला वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देईन. अंगणवाडी सेविका, गावातील आशा, पर्यवेक्षिका यांना त्या बालकाकडे विशेष लक्ष देण्याची विनंती करेन.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.3: वदनी कवळ घेता... - शोध घेऊया. [पृष्ठ १५]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 1.3 वदनी कवळ घेता...
शोध घेऊया. | Q १ | पृष्ठ १५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×