Advertisements
Advertisements
प्रश्न
‘कवितेची ओळख’ या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दांत एक छानशी कथा तयार करून लिहा.
विस्तार में उत्तर
उत्तर
एक छानसं एकत्र कुटुंब असतं. त्या कुटुंबात आजोबा, आजी, बाबा, आई, सुधीर व ताई असे घटक असतात. शाळेत सरला बाईनी काव्यप्रतिभा या विषयावर प्रकल्प दिला असतो. सुधीरला यातलं काहीच कळलेलं नसतं. सर्वजण जर कवितेत बोलले तर त्याला काही कळेल असं आजोबा सांगतात. त्या रात्री सर्वजण गद्य वाक्यात यमक जुळवून पद्यात बोलतात. बाबा रात्रपाळीच्या ड्युटीवरल दिवशी ते सकाळी श्रेष्ठ कवींच्या कवितांची पुस्तके सुधीरला देतात. ती वाचून सुधीरच्या भावना उचंबळून येतात. कविता म्हणजे काय याचा खरा अर्थ त्याला कळतो. केवळ यमक जुळवणे म्हणजे कविता नव्हे. कवितेने भावना उचंबळून आल्या पाहिजेत आणि आपल्या मनात भावनांचे हिरवे हिरवे गार गालिचे पसरले पाहिजेत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?