हिंदी

लाभांशांचे वाटप लाभांश अधिपत्राद्वारे केल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

लाभांशांचे वाटप लाभांश अधिपत्राद्वारे केल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा.

लेखन कौशल

उत्तर

अनमोल स्टील इंडस्ट्रीज लि.
नोंदणीकृत कार्यालय: ३० अनमोल निवास, जे.एम. रोड, नरीमन पाँईट
मुंबई - ४०००२०
CIN: L30408 MH 2003 PLC 110845

              वेबसाईट: www.anmolindustrieslimited.com
                                          ई-मेल: [email protected]
                           Date: 7th May, 2019

फोन: ०२२-९७६७५८७७
फॅक्स: ०२२-३००१०३३१ 
संदर्भ क्रमांक: अ/एम.आर.-डी/७/१९-२०  

श्रीमती ज्योती सुरती
१२, लक्ष्मी निवास,
आम्रपाली मार्ग, बांद्रा,
मुंबई - ४०० ०५०

विषय: समहक्क भागावरील लाभांश वाटपाबाबत
(रु. १० दर्शनी मूल्य असलेले समहक्क भाग)

महोदया,

संचालक मंडळाने मला दिलेल्या सूचनेप्रमाणे मी आपणास कळवू इच्छितो की दिनांक २० एप्रिल, २०१९ रोजी झालेल्या १६ व्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये प्रतिभाग रु. २.५० प्रमाणे रु. १० दर्शनी मूल्य असलेल्या समहक्क भागावर अंतिम (वार्षिक) लाभांश जाहीर केला आहे. त्यास सर्व सभासदांनी सर्वानुमते मान्यता दिली आहे.

कंपनीने कंपनी कायदा २०१३ मधील कलम १२३ नुसार लाभांश घोषणे संदर्भातील सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन करून लाभांश घोषित केला आहे.

आपणास वाटप करण्यात येणाऱ्या लाभांशाचा तपशील खालील प्रमाणे-

नोंदवही पान क्र. धारण केलेल्या भागांची संख्या अनुक्रमांक लाभांश अधिपत्र क्र. ढोबळ लाभांश आयकर कपात (टी.डी.एस.) निव्वळ देय लाभांश
पासून पर्यंत
ए-३० १०० ३०१ ४०० बी-९९३१ ₹ २५०/- निरंक ₹ २५०/-

लाभांश अधिपत्र सोबत जोडले आहे. कृपया ते या पत्रापासून अलग/वेगळे करून बँकेत जमा करावे.
कळावे.

आपला विश्वासू,         
अनमोल स्टील इंडस्ट्रीज करिता

सही          
श्रीमती ज्योती सुरती
कंपनी चिटणीस  

सोबत: लाभांश अधिपत्र

shaalaa.com
नमुना पत्रे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×