हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

M हा द्‌विसंयुजी धातू आहे. सल्फेट आणि फॉस्फेट मूलकांबरोबर त्याने तयार केलेल्या संयुगांची रासायनिक सूत्रे शोधण्यातील पायऱ्या लिहा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

M हा द्‌विसंयुजी धातू आहे. सल्फेट आणि फॉस्फेट मूलकांबरोबर त्याने तयार केलेल्या संयुगांची रासायनिक सूत्रे शोधण्यातील पायऱ्या लिहा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

M हा द्‌विसंयुजी धातू आहे, म्हणून M आयनवरील प्रभार +2 असेल आणि त्याची संयुजा 2 असेल.

A. सल्फेट या मूलकाबरोबर तयार होणाऱ्या संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिण्याच्या पायऱ्या पुढीलप्रमाणे:
पायरी I: मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिणे (आम्लारिधर्मी मूलक डाव्या बाजूला)

M2+ `"SO"_4^{2-}`

पायरी II: त्या त्या मूलकाच्या खाली त्याची संयुजा लिहिणे.

M2+ `"SO"_4^{2-}`
2 2

पायरी III: मूलकाची संख्या मिळवण्यासाठी बाणाने दर्शवल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करणे.

पायरी IV: संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिणे.
MSO4

B. फॉस्फेट या मूलकाबरोबर तयार होणाऱ्या संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिण्याच्या पायऱ्या पुढीलप्रमाणे:
पायरी I: मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिणे (आम्लारिधर्मी मूलक डाव्या बाजूला)

M2+ `"PO"_4^{3-}`

पायरी II: त्या त्या मूलकाच्या खाली त्याची संयुजा लिहिणे.

M2+ `"PO"_4^{3-}`
2 3

पायरी III: मूलकाची संख्या मिळवण्यासाठी बाणाने दर्शवल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करणे.

पायरी IV: संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिणे.
M3(PO4)2

shaalaa.com
संयुगांची रासायनिक सूत्रे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: द्रव्याचे मोजमाप - स्वाध्याय [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 4 द्रव्याचे मोजमाप
स्वाध्याय | Q 4. आ. | पृष्ठ ५७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×