हिंदी

माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा. सुसंगत व अचूक माहिती ______ उपयुक्तता व परिणामकारक दक्षता ______ माहितीपत्रकाची विशेष काळजी व वेगळेपण ______ - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा.

सुसंगत व अचूक माहिती ______ उपयुक्तता व परिणामकारक दक्षता ______ माहितीपत्रकाची विशेष काळजी व वेगळेपण ______ आकर्षक मांडणी व भाषाशैली ______ मनाला भिडणारी शब्दयोजना.

दीर्घउत्तर

उत्तर

  1. सुसंगत व अचूक माहिती: नावच ‘माहिती’ पत्रक असल्याने माहितीपत्रकात ‘माहिती’ला सर्वांत जास्त प्राधान्य दिले जाते. ज्या हेतूने माहितीपत्रक तयार केले जाते, त्या हेतूशी सुसंगत, अचूक माहिती दिली गेली पाहिजे. माहिती आटोपशीर, संक्षिप्त असावी. संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती (उदा., संस्था नोंदणी क्रमांक, संस्था नोंदणी दिनांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल, वेबसाइट, संस्थेचे बोधचिन्ह, घोषवाक्य, पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावे, कामकाजाची वेळ इत्यादी.) माहितीपत्रकात दिली गेलीच पाहिजे. मुख्य म्हणजे माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य, वास्तवच असली पाहिजे. तिच्यात अतिशयोक्त, चुकीची माहिती असता कामा नये. माहितीपत्रकातील माहिती वाचनीयही असली पाहिजे. तथापि त्यात माहितीचा अतिरेक नसावा.
  2. उपयुक्तता व परिणामकारक दक्षता:  आपले माहितीपत्रक उपयुक्त, परिणामकारक कसे होईल याचीही दक्षता घेतली पाहिजे. वाचून झाल्यानंतर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची, वापरण्याची इच्छा झाली पाहिजे. असे उपयोगमूल्य माहितीपत्रकाला केव्हा प्राप्त होईल; तर जेव्हा माहितीपत्रकात वाचकाच्या (ग्राहकाच्या) जिव्हाळ्याची माहिती दिली जाते तेव्हा. ‘माझ्या दैनंदिन जीवनातील समस्या, अडचणी, प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी हे माहितीपत्रक मला उपयोगी पडेल’ असे ग्राहकाला वाटायला लावणारे माहितीपत्रक उपयुक्तच असते. माहितीपत्रकातील ‘तुमच्या पालेभाज्यांवर अतिरिक्त कीटकनाशके मारली आहेत का?’, ‘दुधातली भेसळ ही अशी ओळखा’ अशा वाक्यांकडे वाचकांचे लक्ष गेले, की शहरी व्यक्तींनाही कृषिप्रदर्शनाविषयीचे माहितीपत्रक उपयोगी वाटू लागते.
  3. माहितीपत्रकाची विशेष काळजी व वेगळेपण: इतरांच्या माहितीपत्रकांपेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण कसे असेल याचीही काळजी घेतली पाहिजे. हे वेगळेपण माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आणले पाहिजे. इतरांपेक्षा वेगळी, नवी, रोचक, उपयोगी माहिती देणे आणि वेगळा आकार, वेगळी रचना आणि वेगळा दृष्टिकोन ठेवणे याद्वारे माहितीपत्रकात वेगळेपण आणता येते.
  4. आकर्षक मांडणी व भाषाशैली: माहितीपत्रकातील माहितीची मांडणी आकर्षक असली पाहिजे. मांडणी सरधोपट असू नये. माहितीपत्रक दिसताक्षणी ते ‘वाचावेच’ असे वाटले पाहिजे. त्याचा कागद दर्जेदार असावा, छपाई रंगीत असावी, पहिले पृष्ठ तर खूपच चित्ताकर्षक असावे. त्याचा आकार योग्य असावा. त्याचे शीर्षक, बोधवाक्य ठसठशीतपणे दिसणारे असावे. माहितीपत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी गरजेनुसार त्या क्षेत्रातले कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तज्ज्ञ मदतीला घ्यावेत. ‘माहितीपत्रक’ केवळ पाहिले जात नाही, तर ते ‘वाचले’ही जाते. म्हणूनच ते वाचावेसे वाटावे यासाठी त्याची भाषा आकर्षक आणि वेधक असली पाहिजे.
  5. मनाला भिडणारी शब्दयोजना: आमच्या कृषिपर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल; इथे तुम्ही इतके रंगून जाल, की तुम्हांला दु:ख करत बसायला वेळच मिळणार नाही’ एवढी सगळी माहिती 'आता तणावाला वेळ नाही’ एवढ्या चारच शब्दांत सांगणे म्हणजेच मनाला भिडणारी शब्दयोजना करणे होय! थोडक्यात, भाषाशैली पाल्हाळीक नको तर मनाची पकड घेणारी हवी.
shaalaa.com
माहितीपत्रक
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्न

माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा.


माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा:
आकर्षक मांडणी.


‘माहितीपत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी’ थोडक्यात स्पष्ट करा.


थोडक्यात माहिती लिहा : 
माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे.


थोडक्यात माहिती लिहा : 
माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच.


माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दांत लिहा.


महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनगृहाचे माहितीपत्रक तयार करण्यासाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक राहतील ते लिहा.


एका वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा.


माहितीपत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्टये’ लिहा:

माहितीपत्रक म्हणजे ______ माहितीला प्राधान्य ______ उपयुक्तता ______ लिखित माध्यम ______ भाषाशैली.


माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी करताना लक्षात घ्यावयाच्या काही बाबी थोडक्यात लिहा.


आठवडी बाजाराचे माहितीपत्रक तयार करा.

आठवडी बाजाराचे माहितीपत्रकाचा उद्देश ______ त्यात कोणत्या ______ माहितीला प्राधान्य ______ आठवडी बाजार माहितीपत्रकाची उपयुक्कता ______ सरळ भाषाशैली.


‘हुरडा पार्टी’साठी माहितीपत्रक तयार करा.


माहितीपत्रकाचे महत्त्व स्पष्ट करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

माहितीला प्राधान्य ............ उपयुक्तता ............ वेगळेपण ............ आकर्षक मांडणी ............ भाषाशैली.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×