Advertisements
Advertisements
प्रश्न
महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनगृहाचे माहितीपत्रक तयार करण्यासाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक राहतील ते लिहा.
उत्तर
(१) भोजनगृह चालवणाऱ्या संस्थेचे अथवा सदर भोजनगृहाचे नाव, बोधवाक्य, बोधचिन्ह.
(२) भोजनगृहाचा पत्ता/ स्थापना वर्ष/ नोंदणीक्रमांक/ दूरध्वनी/ मोबाइल क्रमांक/ ई-मेल/ वेबसाईट इत्यादी.
(३) भोजनगृह चालवणाऱ्या व्यक्तीचे/सेवा देणाऱ्या व्यक्तीचे नाव/ संपर्क क्रमांक/ ई-मेल इत्यादी.
(४) भोजनगृहासंबंधी प्राथमिक माहिती. (महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुग्रास जेवण, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, खाद्यपदार्थांचे वैशिष्ट्य.)
(५) भोजनगृहातील सुविधा. (बैठक व्यवस्था, बैठक संख्या, स्वच्छतागृह, लहान मुलांसाठी बगीचा, खेळणी इत्यादी.)
(६) भोजनगृहाची वैशिष्ट्ये. (शाकाहारी आणि मांसाहारी स्वतंत्र शेगडी; मालवणी, वैदर्भीय, मराठवाडी, खानदेशी, कोल्हापुरी, पुणेरी खाद्यपदार्थ यांचे वैविध्य.)
(७) भोजनगृहाची माहिती. ( उदा., खाद्यपदार्थांची यादी, किंमत, भोजनगृहाची वेळ, सुट्टीचा दिवस, घरपोच सेवा.)
(८) भोजनगृहाची अन्य वैशिष्ट्ये. (विविध मसाले, लोणची, पापड, सांडगे, कोकम, आवळा सरबत इत्यादी पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध.)
(९) भोजनगृहाची पूरक छायाचित्रे.
(१०) भोजनगृहापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची माहिती/जवळील नावाजलेले ठिकाण इत्यादी.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा.
‘माहितीपत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी’ थोडक्यात स्पष्ट करा.
थोडक्यात माहिती लिहा :
माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे.
थोडक्यात माहिती लिहा :
माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच.
माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दांत लिहा.
एका वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा.
माहितीपत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्टये’ लिहा:
माहितीपत्रक म्हणजे ______ माहितीला प्राधान्य ______ उपयुक्तता ______ लिखित माध्यम ______ भाषाशैली.
आठवडी बाजाराचे माहितीपत्रक तयार करा.
आठवडी बाजाराचे माहितीपत्रकाचा उद्देश ______ त्यात कोणत्या ______ माहितीला प्राधान्य ______ आठवडी बाजार माहितीपत्रकाची उपयुक्कता ______ सरळ भाषाशैली.
‘हुरडा पार्टी’साठी माहितीपत्रक तयार करा.
माहितीपत्रकाचे महत्त्व स्पष्ट करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
माहितीला प्राधान्य ............ उपयुक्तता ............ वेगळेपण ............ आकर्षक मांडणी ............ भाषाशैली.
माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा.
सुसंगत व अचूक माहिती ______ उपयुक्तता व परिणामकारक दक्षता ______ माहितीपत्रकाची विशेष काळजी व वेगळेपण ______ आकर्षक मांडणी व भाषाशैली ______ मनाला भिडणारी शब्दयोजना.