Advertisements
Advertisements
प्रश्न
मेंडेलची एकसंकर संतती कोणत्याही एका संकरादवारे स्पष्ट करा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
- विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडामध्ये मेंडेलने संकर घडवून आणला. या संकराला एकसंकर म्हणतात.
- प्रथम जनक पिढीत (P1) उंच व बुटकी झाडे संकरासाठी वापरण्यात आली. यांच्या संकरातून जी झाडे निर्माण झाली ती सर्व॑ उंच होती. म्हणून उंच असण्याच्या लक्षणाला मेंडेलने प्रभावी म्हटले.
- पहिल्या संतानीय पिढीतील (F1) सर्व झाडे ही प्रभावी लक्षणामुळे उंच झाली. बुटके हे लक्षण अप्रभावी ठरले; कारण F1 पिढीत: एकही बुटके झाड आढळले नाही.
- F1 पिढीतील सर्व झाडे उंच असली तरी त्यांच्यात बुटक्या झाडांना कारणीभूत ठरणारे घटक दडलेले होते. F1 पिढीतील सर्व झाडांची स्वरूपविधा उंच असली तरी जनुकविधा मिश्र स्वरूपाची होती.
- जनक पिढीतील उंच झाडांची जनुकविधा (TT) असून ती एकाच प्रकारची (T) युग्मके तयार करतात. F1 पिढीतील उंच झाडांची जनुकविधा (Tt) असून ती T व t अशा दोन प्रकारची युग्मके तयार करतात. यावरून आपण असे म्हणू शकतो की F1 पिढीतील उंच झाडे व P1 पिढीतील उंच झाडे यांची स्वरूपविधा समान असली तरी जनुकविधा भिन्न आहे. मेंडेलने हा प्रयोग पुढे सुरू ठेवला व F1 पिढीतील झाडांचे स्वफलन होऊ दिले. त्यातून दुसरी संतानीय पिढी F2 तयार झाली.
- मेंडेलच्या आकडेवारीनुसार एकूण 929 वाटाण्याच्या झाडांपैकी 705 झाडे उंच तर 224 झाडे बुटकी आली. म्हणजेच या झाडांचे स्वरूपविधा गुणोत्तर जवळपास 3 उंच : 1 बुटके तर जनुकीय गुणोत्तर 1TT : 2Tt : 1tt असे आहे.
- यावरून निष्कर्ष असा निघतो की स्वरूपाचा विचार करता F2 पिढीतील झाडे दोन प्रकारची तर जनुकीय संकल्पनेनुसार तीन प्रकारची झाडे येतात. हे प्रकार तक्त्यात दर्शवले आहेत -
F2 शुद्ध प्रभावी TT - उंच झाड समयुग्मनजी F2 शुद्ध अप्रभावी (tt) - बुटकी झाड समयुग्मनजी F2 मिश्र प्रकारची (Tt) - उंच झाड विषमयुग्मनजी
मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग | |||
जनक पिढी P1 | |||
स्वरूपविधा | उंच | बुटकी | |
जनुकविधा | TT | tt | |
युग्मक | T | t | |
पहिली पिढी F1 | Tt | ||
(स्वरूपविधा :उंच) | |||
जनक पिढी P2 | F1 चे स्वयंपरागण | ||
स्वरूपविधा | उंच | उंच | |
जनुकविधा | Tt | Tt | |
युग्मक | T t | T t | |
दुसरी पिढी F2 | पुंयुग्मक/स्त्रीयुग्मक | T | T |
T |
TT उंच |
Tt उंच |
|
t |
Tt उंच |
tt उंच |
shaalaa.com
मेंडेलची एकसंकर संतती
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?