English

मेंडेलची एकसंकर संतती कोणत्याही एका संकरादवारे स्पष्ट करा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

मेंडेलची एकसंकर संतती कोणत्याही एका संकरादवारे स्पष्ट करा.

Answer in Brief

Solution

  1. विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडामध्ये मेंडेलने संकर घडवून आणला. या संकराला एकसंकर म्हणतात.
  2. प्रथम जनक पिढीत (P1) उंच व बुटकी झाडे संकरासाठी वापरण्यात आली. यांच्या संकरातून जी झाडे निर्माण झाली ती सर्व॑ उंच होती. म्हणून उंच असण्याच्या लक्षणाला मेंडेलने प्रभावी म्हटले.
  3. पहिल्या संतानीय पिढीतील (F1) सर्व झाडे ही प्रभावी लक्षणामुळे उंच झाली. बुटके हे लक्षण अप्रभावी ठरले; कारण F1 पिढीत: एकही बुटके झाड आढळले नाही.
  4. F1 पिढीतील सर्व झाडे उंच असली तरी त्यांच्यात बुटक्या झाडांना कारणीभूत ठरणारे घटक दडलेले होते. F1 पिढीतील सर्व झाडांची स्वरूपविधा उंच असली तरी जनुकविधा मिश्र स्वरूपाची होती.
  5. जनक पिढीतील उंच झाडांची जनुकविधा (TT) असून ती एकाच प्रकारची (T) युग्मके तयार करतात. F1 पिढीतील उंच झाडांची जनुकविधा (Tt) असून ती T व t अशा दोन प्रकारची युग्मके तयार करतात. यावरून आपण असे म्हणू शकतो की F1 पिढीतील उंच झाडे व P1 पिढीतील उंच झाडे यांची स्वरूपविधा समान असली तरी जनुकविधा भिन्न आहे. मेंडेलने हा प्रयोग पुढे सुरू ठेवला व F1 पिढीतील झाडांचे स्वफलन होऊ दिले. त्यातून दुसरी संतानीय पिढी F2 तयार झाली.
  6. मेंडेलच्या आकडेवारीनुसार एकूण 929 वाटाण्याच्या झाडांपैकी 705 झाडे उंच तर 224 झाडे बुटकी आली. म्हणजेच या झाडांचे स्वरूपविधा गुणोत्तर जवळपास 3 उंच : 1 बुटके तर जनुकीय गुणोत्तर 1TT : 2Tt : 1tt असे आहे.
  7. यावरून निष्कर्ष असा निघतो की स्वरूपाचा विचार करता F2 पिढीतील झाडे दोन प्रकारची तर जनुकीय संकल्पनेनुसार तीन प्रकारची झाडे येतात. हे प्रकार तक्त्यात दर्शवले आहेत -
    F2 शुद्ध प्रभावी TT - उंच झाड समयुग्मनजी
    F2 शुद्ध अप्रभावी (tt) - बुटकी झाड समयुग्मनजी
    F2 मिश्र प्रकारची (Tt) - उंच झाड विषमयुग्मनजी
मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग
जनक पिढी P1      
स्वरूपविधा उंच बुटकी
जनुकविधा TT tt
युग्मक T t
पहिली पिढी F1 Tt
  (स्वरूपविधा :उंच)
जनक पिढी P2 F1 चे स्वयंपरागण  
स्वरूपविधा उंच उंच
जनुकविधा Tt Tt
युग्मक T t T t
दुसरी पिढी F2 पुंयुग्मक/स्त्रीयुग्मक T T
  T

TT

उंच

Tt

उंच

t

Tt

उंच

tt

उंच

shaalaa.com
मेंडेलची एकसंकर संतती
  Is there an error in this question or solution?
Chapter 16: आनुवंशिकता व परिवर्तन - स्वाध्याय [Page 193]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 16 आनुवंशिकता व परिवर्तन
स्वाध्याय | Q 2. अ. | Page 193
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×