Advertisements
Advertisements
Question
मेंडेलची द्विसंकर संतती कोणत्याही एका संकरादवारे स्पष्ट करा.
Answer in Brief
Solution
- मेंडेलने जेव्हा दविसंकर संततीचे प्रयोग केले तेव्हा त्यांनी विरोधी लक्षणांच्या दोन जोड्यांचा समावेश केला.
- मेंडेलने एकापेक्षा जास्त लक्षणांच्या जोड्या एकाचवेळी वापरून संकरणाचे आणखी प्रयोग केले. यात गोल-पिवळ्या (RRYY) बीजांच्या झाडांचा सुरकुतलेल्या-हिरव्या (rryy) बीजांच्या झाडांशी संकर घडवून आणला. यात बीजाचा रंग व प्रकार अशादोन लक्षणांचा समावेश आहे. म्हणूनच याला द्विसंकर म्हटले जाते.
- जनक पिढी (P1): मेंडेलने गोल-पिवळी बीजे येणाऱ्या तसेच सुरकुतलेली-हिरवी बीजे येणाऱ्या वाटाण्याच्या झाडांची निवड केली आहे. P1 पिढीची युग्मके तयार होताना जनुकांची जोडी स्वतंत्ररीत्या वेगळी होते म्हणजेच RRYY झाडांपासून RR व YY अशी युग्मके तयार होत नाहीत तर फक्त RY प्रकारची युग्मके तयार होतात तसेच rryy झाडांपासून ry युग्मके तयार होतात. यावरून आपण असे म्हणूश कतो की युग्मकांमध्ये जनुकांच्या जोडीचे प्रतिनिधित्व त्यातील प्रत्येकी एका घटकाद्वारे होते.
- एकसंकर प्रयोगांच्या निष्कर्षावरून द्विसंकर प्रयोगाच्या F1 पिढीतील झाडांना पिवळे, गोल वाटाणे येतील अशी मेंडेलची अपेक्षा होती. त्याचे अनुमान बरोबरही होते. या वाटाण्याच्या झाडांची जनुकविधा YyRr असली तरी स्वरूपविधा मात्र पिवळ्या गोल बीया येणाऱ्या झाडांप्रमाणे होती, कारण पिवळा रंग हा हिरव्यापेक्षा प्रभावी व गोल आकार हा सुरकुतलेल्या आकारापेक्षा प्रभावी होता. द्विसंकर प्रयोगाच्या F1 पिढीतील झाडांना दोन लक्षणांच्या समावेशामुळे द्विसंकरज म्हणतात.
- F1 पिढीतील झाडे चार प्रकारची युग्मके तयार करतात. RY, Ry, rY, ry. यांपैकी RY व ry ही युग्मके P1 युग्मकांप्रमाणेच आहेत. 4 प्रकारचे पुंयुग्मक व 4 प्रकारचे स्त्रीयुग्मक यांच्या संकरणातून ज्या 16 वेगवेगळ्या जुळण्या तयार होतात.
मेंडेलचा द्विसंकर संततीचा प्रयोग | ||||
जनक पिढी P1 | ||||
स्वरूपविधा | गोल व पिवळे वाटाणे | सुरकुतलेले व हिरवे वाटाणे | ||
जनुकविधा | RRYY | rryy | ||
युग्मक | RY | ry | ||
पहिली पिढी F1 | RrYy | |||
(स्वरूपविधा: गोल, पिवळे वाटाणे) | ||||
जनक पिढी P2 | F1 चे स्वयंपरागण | |||
स्वरूपविधा | गोल-पिवळे वाटाणे | गोल-पिवळे वाटाणे | ||
जनुकविधा | RrYy | RrYy | ||
युग्मके | RY, Ry, rY, ry |
RY, Ry, rY, ry |
||
दुसरी पिढी F2 |
|
|||
पुंयुग्मक/स्त्रीयुग्मक | RY |
Ry |
rY | ry |
RY | RRYY |
RRYy |
RrYY | RrYy |
Ry | RRYy |
RRyy |
RrYy | Rryy |
rY | RrYY |
RrYy |
rrYY | rrYy |
ry | RrYy |
RrYy |
rrYy | rryy |
- दविसंकर प्रयोगातून निर्माण झालेल्या F2 संतानीय पिढीत मिळालेली गुणोत्तर पुढीलप्रमाणे होती:
- स्वरूपविधा गुणोत्तर = 9 : 3 : 3 : 1
- गोल पिवळी : 9
- सुरकुतलेली पिवळी : 3
- गोल हिरवी : 3
- सुरकुतलेली हिरवी : 1
- जनुकविधा गुणोत्तर = 1 : 1 : 2 : 2 : 4 : 2 : 2 : 1 : 1
RRYY = 1, RRyy = 1, RRYy = 2, RrYY = 2, RrYy = 4, Rryy = 2, rrYy = 2, rrYY = 1, rryy = 1
shaalaa.com
मेंडेलची द्विसंकर संतती
Is there an error in this question or solution?