Advertisements
Advertisements
प्रश्न
(महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया) कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दांत सोदाहरण वर्णन करा.
उत्तर
कवितेत जागोजागी वीररसाची प्रचीती येते. मराठी मनाला आंदोलनाकरिता प्रेरित करण्यासाठी, कवींनी वीररसाच्या शब्दांचा उपयोग केला आहे. 'कंबर बांधून ऊठ घाव झेलाया। महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया' या दोन ओळींमध्ये शाहिरांनी मराठी मनाला समर्पण आणि धाडसाचे आवाहन केले आहे. त्यांनी शिवरायांच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला आहे. 'करी कंकण बांधून साचे', 'सत्यास्तव शिंग फुंकाया', 'पर्वत उलथून यत्नाचे', 'धर ध्वजा करी ऐक्याची', 'पाऊले टाक हिंमतीची', 'घे आण स्वातंत्र्याची' अशा अनेक ओळींमध्ये उत्साह आणि ओज निर्माण केला आहे. ही कविता मराठी मनाला जागृत करण्यासाठी वीररसाने भरलेली आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वैशिष्ट्ये लिहा.
वैशिष्ट्ये लिहा.
असत्य विधान ओळखा.
कवितेतून व्यक्त झालेली ‘महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता’ हा विचार स्पष्ट करा.
महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दांत सांगा.
‘धर ध्वजा करी ऐक्याची। मनीषा जी महाराष्ट्राची’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य लिहा.
तुम्हांला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा.