Advertisements
Advertisements
प्रश्न
निताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदांनंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नितापासून किती अंतरावर असेल?
ध्वनीचा हवेतील वेग = 340 m/s
उत्तर
दिलेले:
- ध्वनीचा हवेतील वेग (v) = 340 m/s,
- काळ (T) = 4 सेकंद
शोधा: अंतर (λ)
सूत्र: v = `lambda/"T"`
आकडेमोड:
सूत्रानुसार,
`340 = lambda/4`
λ = 340 × 4
λ = 1360 m
चमकणाऱ्या विजेचे नितापासूनचे अंतर 1360 m इतके असेल.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या.
पाण्यातील व स्टीलमधील ध्वनी वेगाची तुलना करता ______ मध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो.
खालील विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या.
दैनंदिन जीवनातील ______ या उदाहरणांवरून ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे, हे सिद्ध होते.
0°C तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग 332 m/s आहे. तो प्रतिअंश सेल्सिअस ला 0.6 m/s ने वाढल्यास 344 m/s ला हवेचे तापमान किती असेल?
हायड्रोजन गॅस दोन सारख्या बाटल्यांमध्ये (A व B) एकाच तापमानावर ठेवला आहे. बाटल्यांतील वायूचे वजन अनुक्रमे 12 ग्रॅम व 48 ग्रॅम आहे. कोणत्या बाटलीमध्ये ध्वनीची गती अधिक असेल? किती पटीने?
सुनील दोन समांतर भिंतींच्यामधे उभा आहे. त्याच्यापासून सर्वात जवळची भिंत 660 मीटर अंतरावर आहे. तो ओरडल्यानंतर 4 सेकंदांनंतर त्याला पहिला प्रतिध्वनी ऐकू आला व नंतर 2 सेकंदानंतर दुसरा प्रतिध्वनी ऐकू आला तर,
- ध्वनीचा हवेतील वेग किती असेल?
- दोन भिंतींमधील अंतर किती असेल?
दोन सारख्या बाटल्यांमध्ये हेलिअम वायू भरलेला आहे. त्यातील वायूचे वजन 10 ग्रॅम व 40 ग्रॅम आहे. जर दोन्ही बाटल्यांमधील ध्वनीची गती समान असेल तर तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल?