Advertisements
Advertisements
प्रश्न
पाण्याचे विद्युत अपघटन म्हणजे काय ते सांगून विद्युतअग्र अभिक्रिया लिहून स्पष्ट करा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
पाण्याचे विद्युत अपघटन होताना वाहणाऱ्या विजेच्या प्रवाहामुळे पाण्यातील हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे विघटन होते. शुद्ध पाणी हे विजेचे दुर्वाहक असल्याने विद्युत अपघटन होण्यापूर्वी पाण्यात काही प्रमाणात क्षार किंवा तीव्र आम्ल/आम्लारी मिसळावे लागतात. या प्रक्रियेत ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू तयार होतो, तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू तयार होतो.
संबंधित विद्युतअग्र अभिक्रिया पुढीलप्रमाणे:
- ऋणाग्र अभिक्रिया:
\[\ce{2H2O_{(l)} + 2e^- -> H2_{(g)} + 2OH^-_{(aq)}}\]
H2O इलेक्ट्रॉन घेतो आणि ऋणाग्राजवळ H2 व OH- हे आयन तयार होतात. - धनाग्र अभिक्रिया:
\[\ce{2H2O_{(l)} -> O2_{(g)} + 4H^+_{(aq)} + 4e^-}\]
H2O धनाग्राजवळ O2, H+ आयन आणि इलेक्ट्रॉन तयार करतो. - संपूर्ण अभिक्रिया:
\[\ce{2H2O_{(l)} -> O2_{(g)} + 2H2_{(g)}}\]
पाण्याच्या विद्युत अपघटनामुळे ऋणाग्रापाशी तयार होणाऱ्या हायड्रोजन वायूचे आकारमान धनाग्रापाशी तयार होणाऱ्या ऑक्सिजनच्या दुप्पट आहे.
shaalaa.com
पाण्याचे विद्युत अपघटन
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?