हिंदी

पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा, हा संवाद वर्गात सादर करा. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा, हा संवाद वर्गात सादर करा.

लेखन कौशल

उत्तर

पाऊस:  तापलेल्या धरतीला गारवा मिळावा, म्हणून मी इतक्या उंचावरून खाली येतो आणि तू मला का अडवतेस?
छत्री: नाही, भाऊ! मी तुम्हांला अडवत नाही. मी फक्त माणसांना भिजण्यापासून वाचवते.
पाऊस:  पण कधी तरी माणसांनी भिजावं की!गुरेढोरे, सारी सृष्टी भिजते... मग माणसांचे एवढे ते काय? 
छत्री: तसे नव्हे! माणसे भिजली तर त्यांना पडसे, खोकला येतो. डॉक्टरकडे जावे लागते. विशेषत: बालकांची मलाच काळजी घ्यावी लागते.
पाऊस:  खरं आहे तुझ. तू त्यांचं संरक्षण करतेस. पण एक विचारू?
छत्री: विचारा ना!
पाऊस:  तू माणसांचे रक्षण करतेस. मग तू का भिजतेस?
छत्री: उत्तर एकदम सोप्पं आहे! अहो, वर्षभर मी अडगळीत असते. तुम्ही आलात की मला अंघोळीचा आनंद मिळतो. हो की नाही??
पाऊस: धन्य आहे गं तुझी बाई !!
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.4: श्रावणमास (कविता) - चला संवाद लिहूया. [पृष्ठ १८]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 1.4 श्रावणमास (कविता)
चला संवाद लिहूया. | Q (१) | पृष्ठ १८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×