Advertisements
Advertisements
प्रश्न
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत
टिप्पणी लिखिए
उत्तर
- चार्लस् डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. यासाठी त्याने विविध प्रदेशांतील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणांवरून 'सक्षम ते जगतील' असे मत मांडले.
- याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की, सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात. जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो.
- सक्षम जिवाच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात. हे निसर्गच निवडतो. निसर्गात सुयोग्य जीवन जगतात, बाकीचे टिकाव धरू शकत नाहीत.
- जगलेले जीव पुनरुत्पादन करून स्वत:च्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात.
- हा सिद्धांत 'ओरिजिन ऑफ स्पीशीज' (Origin of Species) या डार्विनच्या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत सर्वमान्य आहे; कारण निसर्गातील अनेक उदाहरणांवरून तो स्पष्ट होतो.
shaalaa.com
डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत (Darwin’s theory of natural selection)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?