हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

परिसरात उपलब्ध असणारी एकबीजपत्री व द्विबीजपत्री वनस्पती मूळासहित उपलब्ध करून दोन्ही वनस्पतींचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यांचे संपूर्ण रेखाटन करा व तुमच्या शब्दात वैज्ञानिक भाषेत परिच्छेद लिहा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

परिसरात उपलब्ध असणारी एकबीजपत्री व द्विबीजपत्री वनस्पती मूळासहित उपलब्ध करून दोन्ही वनस्पतींचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यांचे संपूर्ण रेखाटन करा व तुमच्या शब्दात वैज्ञानिक भाषेत परिच्छेद लिहा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

(1) जास्वंद (द्‌विबीजपत्री वनस्पती)

  • मूळ: ठळक, प्राथमिक मूळ - सोटमूळ या प्रकारातील मुळे.
  • पाने: साधी, जाळीदार शिराविन्यास असलेली पाने.
  • फुले: देठ असलेली, पूर्ण, द्विलिंगी, पंचभागी.
  • निदलपुंज: पाच हिरव्या रंगाच्या निदलांचा एकमेकांना बद्ध असलेला निदलपुंज.
  • दलपुंज: पाच लाल रंगाच्या सुट्या पाकळ्यांचा दलपुंज
  • पुमंग/पुंकेसर: पुंकेसर, परागकोश आणि वृंत यांचा बनलेला आहे. अनेक पुंकेसर एकत्र येऊन परागनलिका तयार होते. परागकोशाची रचना द्विपाळी असून वृक्काच्या आकाराचे परागकोश वुंताच्या टोकावर दिसतात.
  • जायांग/स्त्रीकेसर: कुक्षी, कुक्षीवृंत आणि अंडाशवापासून स्त्रीकेसर बनलेला असतो. 5 स्त्रीकेसर दिसून येतात.

(2) कांदा : (एकबीजपत्री वनस्पती)

कांद्याचे रोप छोटे असून त्याचा कंद भूमिगत असतो.

  • मूळ: तंतुमय मुळे.
  • खोड: भूमिगत, कंदाच्या स्वरूपात.
  • पाने: पोकळ नलिकेसमान, पात्यासारखी.
  • फुले: पूर्ण व द्विलिंगी, निदलपुंज व दलपुंज दोन्ही एकाच परिदलपुंज या स्वरूपात. प्रत्येकी 3 याप्रमाणे दोन थरांत त्यांची रचना.
  • पुमंग/पुंकेसर: परिदलपुंजांवर चिकटलेले 6 पुंकेसर.
  • जायांग/स्त्रीकेसर: त्रिभागी, अंडाशय वरच्या पातळीवर.
shaalaa.com
उपसृष्टी - बीजपत्री - आवृत्तबीजी वनस्पती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: वनस्पतींचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ८०]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 6 वनस्पतींचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 5. | पृष्ठ ८०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×