Advertisements
Advertisements
प्रश्न
वनस्पतींचे वर्गीकरण करताना कोणत्या बाबींचा विचार केला जातो? ते सकारण लिहा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
वनस्पतींचे वर्गीकरण करताना खालील बाबींचा विचार केला जातो:
- वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत: जर वनस्पतींना मूळ, खोड आणि पाने यांसारखे अवयव असतील, तर त्यांचा समावेश टेरिडोफायटा, आवृत्तबीजी, आणि अनावृत्तबीजी यांसारख्या विभागात केला जातो. जर वनस्पती निम्नस्तरीय असतील, तर त्यांचा थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा या विभागांत समावेश केला जातो.
- पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती असणे किंवा नसणे: टेरिडोफायटा आणि बीजपत्री विभागातील वनस्पतींमध्ये पाणी आणि अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती असतात, परंतु ब्रायोफायटा आणि थॅलोफायटा विभागांतील वनस्पतींमध्ये या प्रकारच्या ऊती सापडत नाहीत.
- फुले, फळे व बिया येणे किंवा न येणे: या आधारावर वनस्पतींचे अबीजपत्री आणि बीजपत्री विभागीकरण केले जाते. अबीजपत्री वनस्पतींमध्ये फुले, फळे आणि बिया नसतात, परंतु बीजपत्री वनस्पतींमध्ये बिया असतात.
- बिजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे: संशोधनानुसार, बीजपत्री वनस्पतींचे अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी वर्गीकरण केले जाते. अनावृत्तबीजी वनस्पतींमध्ये कोणतेही प्राकृतिक आच्छादन नसते, परंतु आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये बिया या फळांच्या आत तयार होतात.
-
बियांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून: आवृत्तबीजी वनस्पतींचे एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री असे वर्गीकरण करता येते. एकबीजपत्री वनस्पतींमध्ये बी चे दोन समान भाग नसतात, परंतु द्विबीजपत्री वनस्पतींमध्ये बी चे दोन समान भाग असतात.
shaalaa.com
वनस्पतींच्या वर्गीकरणाचा आधार
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?