Advertisements
Advertisements
प्रश्न
पृथ्वीच्या केंद्रावर ‘g’ चे मूल्य शून्य असते याविषयी स्पष्टीकरण लिहा.
उत्तर
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्राकडे जात असताना g चे मूल्य बदलते; ते कमी होत जाते व पृथ्वीच्या केंद्राशी शून्य होते.
स्पष्टीकरण : पृथ्वी हा एकसमान घनतेचा व M वस्तुमान असलेला गोल आहे असे आपण मानू. आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली d या खोलीवरील P हा बिंदू विचारात घ्या. या जागी m वस्तुमानाचा द्रव्यकण ठेवल्यास त्यावरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल,
F = `(GmM^')/((R - d)^2)`,
येथे R = पृथ्वीची त्रिज्या व M' = (R-d) त्रिज्या असलेल्या गोलाचे वस्तुमान, (R-d) = P चे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर.
पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली g चे मूल्य
M' = `4/3pi (R - d)^3 xx M/(4/3piR^3)`
= `(M(R - d)^3)/(R^2)` येथे P च्या
बाहेरील भाग (आकृती मधील भाग II) परिणामकारक नसतो. P या स्थानी गुरुत्व त्वरण,
g = `F/m`
= `G/(R - d)^2 xx (M(R - d)^3)/R^3`
= `(GM(R - d))/R^3` याचे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्व त्वरणाच्या मूल्यापेक्षा `((GM)/R^2)` कमी आहे.
d वाढल्यास g चे मूल्य कमी होते व पृथ्वीच्या केंद्राशी g = 0 (∵ d = R).
APPEARS IN
संबंधित प्रश्न
समजा की g चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर, एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का? का?
एक वर फेकलेली वस्तू 500 मी उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल? त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल? g = 10 m/s2
G चे CGS एकक dyne.cm2/g2 आहे.
G चे मूल्य स्थानानुसार बदलते.