Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
कामगार चळवळ
उत्तर
भारतातील कामगार चळवळींमागे औद्योगिकीकरणाची पार्श्वभूमी आहे.
१. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या अशा उद्योगांना सुरुवात झाली होती. १८९९ मध्ये आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरता रेल्वे कामगारांनी संप केला.
२. १९२० मध्ये कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस' या व्यापक संघटनेची स्थापना झाली.
३. स्वातंत्र्योत्तरकाळात १९६० व ७० च्या दशकात कामगार चळवळ अधिक प्रभावी ठरली; मात्र १९८० पासून ही चळवळ विखुरली गेली.
४. सध्या जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे भारतभर कामगारांचे नवनवे प्रश्न उभे राहत आहेत. अस्थिर रोजगार, कंत्राटी कामगार, आर्थिक असुरक्षितता, कामगार कायद्यांचे संरक्षण नसणे, अमर्याद कामाचे तास, कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता, अनारोग्य इत्यादी आजच्या कामगार चळवळीसमोरील समस्या आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
शेतकरी चळवळीची ______ ही प्रमुख मागणी आहे.
संकल्पना स्पष्ट करा.
आदिवासी चळवळ
पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.
भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या?
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
हरितक्रांतीने श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी असे विभाजन केले.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
आदिवासी चळवळ
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
ग्राहक चळवळ
तक्ता पूर्ण करा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
जलक्रांती
१९८६ साली ______ अस्तित्वात आला.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा: