Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व
उत्तर १
- संविधानकारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोघांनाही समान राजकीय अधिकार प्रदान केले.
- त्यामुळे १९५२ च्या पहिल्या लोकसभेत २२ महिला निवडून आल्या होत्या. ही संख्या वाढत जाऊन २०१४ च्या निवडणुकीत ही संख्या ६६ वर जाऊन पोहोचली आहे.
- लोकसभेच्या एकूण जागांच्या ५०% जागा स्त्रियांसाठी राखून ठेवाव्यात, असे विधेयक संसदेच्या पटलावर मांडले गेले आहे. .
- स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णयप्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग वाढेल.
उत्तर २
१. ७३ व्या व ७४ व्या संविधान दुरुस्तीनुसार स्थानिक शासनसंस्थेत महिलांना ३३% व पुढे जाऊन आता ५०% आरक्षण मिळाल्यामुळे शासनसंस्थेत महिलांचा सहभाग वाढत आहे.
२. महिलांच्या प्रतिनिधित्वामुळे महिला सक्षमीकरणास वेग मिळत आहे.
३. सांख्यिकी माहितीनुसार १९५१ ते २०१४ या ६३ वर्षांच्या कालावधीत महिला खासदारांच्या संख्येत जवळपास तीन पट वाढ झाली आहे.
४. १९५१-५२ साली महिला खासदारांची लोकसभेतील संख्या २२ (४.५%) होती. २०१४ साली ही संख्या ६६ (१२.१५%) इतकी आहे.
५. वरील आकडेवारीवरून स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व सातत्याने वाढत आहे, असे दिसते.
संबंधित प्रश्न
महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ______ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?
सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय?
न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे?
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
अन्याय-अत्याचार प्रतिबंधक कायदा
७३ व्या व ७४ व्या संविधान दुरुस्तीने ______च्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली.