Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
प्रादेशिक पक्ष
लघु उत्तरीय
उत्तर
- विशिष्ट प्रदेशाच्या विकासासाठी कार्य करणारे आणि त्या प्रदेशाचा अभिमान बाळगणारे राजकीय गट प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जातात. या पक्षांचा प्रभाव प्रामुख्याने त्यांच्या संबंधित प्रदेशापुरता मर्यादित असतो.
- प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
- लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे.
- किमान दोन सदस्य विधानसभेत निवडून येणे.
- विधानसभेच्या एकूण जागांपैकी किमान 3% जागा किंवा 3 जागा जिंकणे.
- हे पक्ष प्रामुख्याने प्रादेशिक समस्यांवर लक्ष केंद्रीत करतात आणि त्या समस्यांचे समाधान प्रादेशिक पातळीवरच करावे, असा त्यांचा आग्रह असतो.
- ते आपल्या प्रदेशासाठी अधिक स्वायत्तता मिळवण्यासाठी कार्य करतात आणि प्रशासकीय व व्यावसायिक संधींसाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यावर भर देतात.
- भारतामधील काही प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये शिवसेना (महाराष्ट्र), शिरोमणी अकाली दल (पंजाब), आणि आसाम गण परिषद (आसाम) यांचा समावेश होतो.
shaalaa.com
प्रादेशिक पक्ष
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.3: राजकीय पक्ष - संकल्पना स्पष्ट करा
संबंधित प्रश्न
नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष _______ येथे आहे.
जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर ________ या राजकीय पक्षात झाले.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
‘शिरोमणी अकाली दल’ हा राष्ट्रीय पक्ष आहे.
भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाला आहे?
तक्ता पूर्ण करा.
दिलेला आकृतिबंध पूर्ण करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा: