Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
‘शिरोमणी अकाली दल’ हा राष्ट्रीय पक्ष आहे.
विकल्प
बरोबर
चूक
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
‘शिरोमणी अकाली दल’ हा राष्ट्रीय पक्ष आहे- चूक
कारण-
- 'शिरोमणी अकाली दल' हा पंजाबमधील महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे. या पक्षाची स्थापना १९२० मध्ये झाली. हा पक्ष पंजाबमधील धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास प्राधान्य देतो. 'प्रादेशिक पक्ष' म्हणून मान्यता मिळवण्यासाठीचे निकष या पक्षाने पूर्ण केले आहेत.
- भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या मान्यतेचे निकष निश्चित करून, राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असतो.
- संसद आणि विधिमंडळात मिळवलेल्या जागा आणि निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी यांचा या अटीत समावेश असतो.
- शिरोमणी अकाली दल हा 'राष्ट्रीय पक्ष' म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही. तो पंजाब राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय नव्हे; तर प्रादेशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिलेली आहे.
shaalaa.com
प्रादेशिक पक्ष
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.3: राजकीय पक्ष - चूक की बरोबर ते ओळखा